भारत बंद निमित्त ब्रम्हपुरी कडकडीत बंद.सर्व पक्षीय व विविध संघटनांच्या वतीने शिवाजी चौक येथे धरणे आंदोलन करून केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध केला
राजुरा - प्रतिनिधी ( रोशन येवले )
राजुरा : - अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने शेतकरी विरोधात पारित करण्यात आलेले ३ विधेयक मागे घेण्यात यावे व शेतकऱ्यांच्या इतरही मागण्यासाठी दिल्ली येथे 26 नोव्हेंबर 2020 पासून महा आंदोलन सुरू आहे.परंतु सरकार त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे.म्हणून किसान महा आंदोलनाच्या वतीने 8 डिसेंबर 2020 रोजी भारत बंदची घोषणा केली होती.त्या अनुषंगाने ब्रम्हपुरी येथे सर्व पक्षीय व विविध संघटनांच्या वतीने भारत बंद आंदोलनात सहभागी होऊन ब्रम्हपुरी शहर कडकडीत बंद पाळण्यात आले तसेच सकाळी नऊ वाजता शहराच्या मुख्य मार्गांनी टू व्हीलर रॅली काढून शिवाजी चौक येथे निदर्शने व धरणे आंदोलन करून केंद्र सरकार चा निषेध करीत उपविभागीय कार्यालय मार्फत मा.राष्ट्रपती व मा.पंतप्रधान यांना निवेदन देऊन शेतकरी विरोधात पारित करण्यात आलेले विधेयक रद्द करण्याची मागणी करण्यात आली. कोरोणा काळात भाजप प्रणित केंद्र सरकार ने तीन शेतकरी विरोधी विधेयक लोकसभेत कोणतीही चर्चा घडवून न आणता बहुमताच्या भरोषावर पारित केले ज्या मुळे केवळ शेतकऱ्यांचे च नुकसान होणार नाही तर संपूर्ण शेती व्यवसायावर तसेच सर्व साधारण ग्राहकांवर त्याचा विपरीत परिणाम होईल व या कायद्याचा फायदा केवळ या देशातील मोटमोटे उद्योग पती,भांडवलदार यांना होणार आहे म्हणून मोदी सरकारने हे शेतकरी विरोधी विधेयक काढले या अध्यादेशाच्या विरूद्ध देशातील तमाम शेतकरी संघटनांनी आंदोलन करीत आपला रोष व्यक्त केला.या आंदोलनाला ब्रह्मपुरी कडकडीत बंद पाळण्यात आला दिवसभर अनेक बाजारपेठा बंद होत्या. केंद्र सरकारने शेतकऱ्याच्या विरोधात तीन विधेयके पारित केली ती विधेयके रद्द करावे. तसेच शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांचे निवेदन देण्यात आले याप्रसंगी विनोद झोडगे, प्रभाकर सेलोकर, डॉ. देवेश कांबळे,विलास विखार, एडवोकेट गोविंदराव भेडारकर, डॉ. राजेश कांबळे, प्रमोद चीमुरकर,प्रशांत डांगे ,मोटू पिलारे ,डॉ. प्रेमला ल मेश्राम , नरू नरड ,सुखदेव प्रधान ,सुदाम राठोड, अविनाश राऊत ,अमृत नकाते ,एडवोकेट हेमंत उरकुडे, हीतेंद्र राऊत, थानेश्वर कायलकर,प्रभु लोखंडे , प्रा.श्याम करंबे,आशिष गांदलेवार प्रज्वल वाघमारे,मनोज वझाडे, डॉ.जयप्रकाश धोंगडे,राजेश माटे,भिमराव वंजारी,अमोल सुकारे,उमेश धोटे,मोहन बागडे, सोमेश्वर उपासे,मोणू हजारे,आदेश मालोदे,किशोर राऊत,अनंत मेश्राम,नानाजी तूपट,काशिनाथ ख रकाडे,नरेंद्र गाडगी लवार,वामन मिसार,संदीप श्रीवास्तव,अनुप मोटघरे,किशोर प्रधान, भागवत भरें बाळू पीलारे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!