घुग्गुस :(वसंत। मुन)
नगरपरिषदेच्या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांतर्फे 23 डिसेंम्बर रोजी ग्रामपंचायत निवडणूकीवर बहिष्कार टाकण्यात आला शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 24 डिसेंम्बर ला घुग्घुस बंद पुकारण्यात आला या बंदला 100 टक्के प्रतिसाद मिळाला यानंतर 27 डिसेंम्बर रोजी तहसीलदार यांनी घुग्घुस ग्रामपंचायत कार्यलयात सर्वपक्षीय नेत्यांना ग्रामपंचायत निवडणूकीत शामिल होण्याचे आवाहन केले.
28 डिसेंम्बर रोजी चक्काजाम आंदोलन करण्यात आला व आज दिनांक 29 डिसेंम्बर रोजी ग्रामपंचायत कार्यलय परिसरात सर्वपक्षीय नेत्यांनी मुंढन व अर्धनग्न आंदोलन पुकारले यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी मुख्य चौकात अर्धनग्न अवस्थेत रैल्ली काढली.
आजच्या मुंढन आंदोलनात काँग्रेसचे पवन आगदारी, शिवसेनेचे गणेश शेंडे, यंग चांदा ब्रिगेडचे इम्रान खान, स्वप्ननील वाढई,राष्ट्रवादीचे श्रीनिवास गोस्कुला, सामाजिक कार्यकर्ते बंडू रामटेके, वनकर, युवक काँग्रेसचे सुरज कन्नूर, माजी सरपंच संतोष नूने, पंचायत समिति माजी सभापति रोशन पचारे, ग्रामपंचायत सदस्य पवन अगदारी आदीने मुंडण केले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!