आम आदमी पार्टी पोहोचली थेट शेतकऱ्यांच्या बांधावर तहसीलदार , यांनी दिले तात्काळ चौकशीचे आदेश

आम आदमी पार्टी पोहोचली थेट शेतकऱ्यांच्या बांधावर तहसीलदार , यांनी दिले तात्काळ चौकशीचे आदेश




सावली :(प्रतिनीधी) 

सावली तालुका हा महाराष्ट्रात धान उत्पादन तालुका म्हणून नावारूपाला आलेला आहे.  हयाच आधारावर स्वातंत्र्य पूर्व काळातील इंग्रजांनी तालुक्यातील पाथरी या गावाला लागून निसर्गाच्या सानिध्यात 1917 मध्ये असोलामेंढा तलावाची निर्मिती केली व तालुक्यातील अगदी शेवटच्या टोकापर्यंत नहराचे जाळे विणून तलावाच्या पाण्याचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविला तालुक्यात पाण्याचा साठा जरी  मुबलक असला तरी यावर्षी मात्र निसर्गाला ते मान्य नव्हते धान पिक अगदी कापणीला आले असतांनाचं मात्र शेतकऱ्यांकडे निसर्गाने पाठ फिरवली व शेतात उभे असलेले धानाचे पीक पूर्णताहा मावा तुडतुडा या रोगाने करपून गेले अशातच तालुक्यातील रुद्रपुर येथील चिंतामन बुद्धा मडावी यांच्या शेतातील संपूर्ण धान पीक कसुन निघाले मात्र प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली नाही. 

 असे आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सदस्या ॲड. पारोमिता गोस्वामी  यांना कळताच दिनांक 3/ 11/ 2020 ला कार्यकर्त्यांसह थेट आदिवासी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचल्या व तहसीलदार सावली यांच्याशी ब्रम्हध्वणी द्वारे सांगून पिकाचे पंचनामे तात्काळ करून नुसकान भरपाई देण्याची मागणी लावून धरली असता तहसीलदार श्री. पाटील साहेब यांनी कृषी अधिकारी व स्थानिक तलाठी यांना चौकशीचे तात्काळ आदेश दिले.  यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष गौरव शामकुळे तालुका अध्यक्ष श्री.  अनिल मडावी सोशल मीडिया प्रमुख दिनेश घाटे आदिवासी तालुका उपाध्यक्ष चेतन मंगाम उपस्थित होते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!