नारंडा विजवितरण कार्यालयापुढे वीज बिलाची होळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे आंदोलन

नारंडा विजवितरण कार्यालयापुढे वीज बिलाची होळी  विदर्भ राज्य आंदोलन समितीचे आंदोलन 


चंद्रपुर (प्रतिनिधी )  
            लॉकडाउन काळातील तीन महिन्यांचे वीज बिल माफ करावे, यासह अन्य मागण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे कार्यकर्ते व नागरिकांनी कोरपना तालुक्यातील नारंडा येथील वीज वितरण कंपनीच्या  कार्यालयापुढे वीज बिलाची होळी करून आंदोलन केले. 
            यावेळी लॉकडाउन काळातील वीज बिल माफ झालेच पाहिजे,  शेतकऱ्यांना मोफत वीज मिळालीच पाहिजे, कृषी पंपाचे वीजबिल माफ झालेच पाहिजे, अशा जोरदार घोषणा आंदोलक कार्यकर्त्यांनी दिल्या.
           दिनांक २ नोव्हेंबर, रोज सोमवारला दुपारी एक वाजता झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष माजी आमदार ऍड.वामनराव चटप,अरुण नवले, काकडे गुरुजी,बंडू राजूरकर, अविनाश मुसळे,भास्कर मत्ते,प्रमोद उराडे,आशिष मुसळे, बिपीन लोहे,निलेश चिंचोलकर, आंबेकर यांनी केले. 
           प्रत्यक्षात विजेचा उत्पादन खर्च प्रती युनिट अडीच रुपये असताना ग्राहकांकडून सरासरी साडेसात रुपये व औद्योगिक वापराकरिता साडेअकरा रुपये प्रती युनिट या प्रमाणे घेण्यात येणारा दर निम्मा करावा,अवाजवी येणाऱ्या वीजबिला मुळे सर्वच जनता त्रासून गेली असून लॉक डाउन काळातील वीज बिल माफ करावे, कृषी पंपाचे थकीत वीजबिल माफ करावे, तातडीने वीज पंपाची जोडणी करावी, लोडशेडींग संपवून पूर्ण दाबाची व पूर्ण वेळ वीज द्यावी, इत्यादी मागण्या आंदोलकानी केल्या. यावेळी मुख्यमंत्री,ऊर्जामंत्री यांना पाठविण्यासाठी मागण्याचे निवेदन विद्युत अभियंता यांना देण्यात आले. या आंदोलनात कोरपना तालुक्यातील नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!