जिल्हा भाजपाचे कार्यकारीणीत मूल तालुक्याला ठेंगा!
जिल्हा भाजपाचे कार्यकारीणीत मूल तालुक्याला ठेंगा!
मूल (प्रतिनिधी)
एकेकाळी जिल्हा भाजपाचे राजकारण चालविणार्या मूल तालुक्याला देवराव भोंगळे यांचे नेतृत्वाखालील जिल्हा भाजपा कार्यकारीणीत "ठेंगा" मिळाल्यांने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नव्याने घोषित झालेल्या या कार्यकारीणीत साधे कार्यकारणी सदस्य म्हणूनही मूल तालुक्यातील एकाही भाजपा कार्यकर्त्यांची वर्णी लागली नाही.
जिल्हयात भाजपा वाढविण्यात माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांचा मोठा वाटा आहे. अॅड. दादा देशकर नंतर, त्या जिल्हा भाजपाच्या अध्यक्षही झाल्या होत्या. त्यांचेसह मूल तालुक्यातील अनेक भाजपाचे नेत्यांची जिल्हास्तरावर महत्वाचे पदावर वर्णी लागली होती. मात्र यावेळी पहिल्यांदाच तालुक्यातील एकाही कार्यकत्याला जिल्हा कार्यकारीणीत स्थान न मिळाल्यांने, या भागाचे नेतृत्व करणारे माजी अर्थमंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार मूल तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांवर नाराज आहेत काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
उल्लेखनीय म्हणजे, मुल तालुका हे राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा गृह तालुका आहे. असे असतानाही, घोषित झालेल्या जिल्हा भाजपा कार्यकारिणीत, तालुका भाजपातील एकाही कार्यकर्त्याला स्थान मिळालेले नाही. जिल्हा ग्रामीण कार्यकारणीत भाजपात दोन-चार कार्यकर्ते चंद्रपूर शहरातील देखील आहे, पण मूल तालुक्याला डावलले हे येथे उल्लेखनीय!
मूल तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांत आपसांत समन्वय नाही. भाजपाची संघटनात्मक बांधणी असण्यापेक्षा नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद मध्ये निवडूण आलेला प्रत्येक पदाधिकारी हेच स्वत:ला 'भाजपा' समजत असल्यांची सामान्य नागरीकांची समज होत आहे. वैयक्तीक वाद चव्हाटयावर आणत असून, सोशल मिडीयावर चर्चाही घडवित आहे. विकासाचे प्रश्न घेवून येण्याऐवजी ठेकेदारी मागण्यासाठीच मूलचे भाजपाचे कार्यकर्ते सक्रिय राहतात त्यामुळे भाजपाचे वरिष्ठ मूल तालुक्यांवर नाराज असल्याची भावना आमचे प्रतिनिधीशी एका जिल्हा स्तरीय पदाधिकारीने बोलतांना व्यक्त केली होती. नव्याने झालेल्या जिल्हा कार्यकारिणीत ही बाब अधोरेखित करणारी आहे.
अर्थमंत्री असतांना सुधीर मुनगंटीवार यांनी करोडो रूपये आणून मूलचा चेहरा मोहरा बदलविला, मात्र या विकास कामाला दर्जेदार करण्याऐवजी, स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी या कामाची स्वत:च ठेकेदारी करीत, दर्जाहीन कामे केली, वेळेत कामे न करता, उशीरांने कामे केली. यामुळे मोठा निधी आणूनही निवडणूकीत, आमदार मुनगंटीवार यांना दमछाक लागली होती.
मतदारांची कार्यकत्यावरील नाराजीचा फटका मुनगंटीवार यांना सहन करावा लागला. खुद्द नगराध्यक्षाच्या वार्डात पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आले. यामुळेच, मूल येथील भाजपाच्या कुणालाही जिल्हा कार्यकारीणीत थेट स्थान दिले नसावे असेही बोलल्या जात आहे.
जिल्हा कार्यकारिणी तयार करताना विधानसभेच्या दृष्टीने विचार करण्यात आला, जिल्हा कार्यकारिणीतील महत्त्वाची पदे ही बल्लारपूर निर्वाचन क्षेत्रामध्ये देण्यात आली आहे. मूल तालुक्याला डावलण्याचा कोणताही प्रश्न नाही. - देवराव भोंगळे, जिल्हा अध्यक्ष भाजपा (ग्रामीण)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!