वीर भगतसिंह संघ राजुरा द्वारा आयोजीत ऑनलाईन भाषण स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा

राजुरा - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )

राजुरा : - वीर भगतसिंह संघ राजुरा द्वारा आयोजीत ऑनलाईन भाषण स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला असून लॉक डाऊन च्या काळात संपुर्ण देश कोरोना महामारीचा सामना करत होता त्यावेळी वीर भगतसिंग संघाने भाषण स्पर्धा आयोजित केली होती.स्पर्धेचा विषय ओबीसी जनगणना काळाची गरज  हा या स्पर्धेचा विषय होता स्पर्धेमध्ये स्पर्धकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला प्रथम पारितोषिकाचे मानकरी  कु.अश्विनी सुरेश बघेले रा.चंद्रपुर हि विध्यार्थीनी ठरल. दि. २१/११/२०२० रोजी आम आदमी पक्षाचे सन्माननीय जिल्हा अध्यक्ष सुनीलजी मुसडे यांच्या प्रमुख उपस्थित बक्षीस वितरण सोहळा सुरेश बघेले यांच्या घरीं पार पडला यावेळी वीर भगतसिंह संघाचे संस्थापक अध्यक्ष स्वप्नील कोहपरे व वीर भगतसिंह संघाचे संस्थापक सचिव रोशन येवले व सुरेशजी बघेले यांचा संपुर्ण परिवार उपस्थित होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!