तहसील कार्यालय तसेच बस्टॉप समोरील अतिक्रमण व अवैध प्रवासी वाहतूक त्वरीत हटविण्यात यावे करीता उप विभागीय पोलीस अधिकारी यांना शिवसेना उप तालुका प्रमुख केवलसिंग जुनी यांनी दिले निवेदन

उप विभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली API मोहोड PSI शेख यांचे हस्ते अतिक्रमण काढण्यास केले मार्गदर्शन

जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )

चंद्रपूर : - पोलिस स्टेशन चिमूर च्या माध्यमातून दिनांक. २१/११/२०२० रोजी उप विभागीय पोलीस अधिकारी नितीन बगाटे ( भा.पो.से.) यांचे उपस्थितीत पोलीस स्टेशन चिमूर येथील Api मंगेश मोहोड, Psi अलीम शेख व पोलीस कर्मचारी यांनी मिळून चिमूर शहरात  राष्ट्रिय महामार्ग ३५३ ई वरील अतिक्रमनित दुकाने तसेच त्यावर धडक मोहीम राबवून चिमूर शहरातील व महामार्गावरील वाहतुकीस अडथळे निर्माण होणाऱ्या दुकान व वाहन, महामार्गावरील ठेले, भाजीपाला दुकान हे रस्त्याचे बाजूला करून नो पार्किंग वाहनांवर कारवाई करण्यात आल्या. तसेच दुकानदार व नागरिकांना रस्त्यावर दुकान व वाहने न लावण्याबाबत च्या संपूर्ण चिमूर शहरात सूचना देण्यात आल्या.
         यापुढे सूचनांचे पालन न झाल्यास कडक कारवाईचे पोलिसांनी संकेत दिले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!