सिंदेवाही येथे विज बिल माफ करण्या संदर्भात घंटा नाद आंदोलन
सिंदेवाही (प्रतिनिधी)
आम आदमी पार्टी सिंदेवाही च्या वतीने वीज बिल माफ करण्या संदर्भात घंटा नाद आंदोलन करून सरकारचा निषेध व्यक्त केला, सरकारने आश्वासने देऊन लोकांना भूलथापा दिल्या, गरीब मजूर लोकांच्या तीन महिन्यापासून काम नसल्याने हतबल झाले,त्यांनी कसं वीज बिल भरायच , वीज बिल कमी करण्या ऐवजी वाढ केली,त्या सरकारला घंटा वाजवून त्यांना जागृत करून लोकांचे वीज बिल कमी करण्यासंदर्भात आंदोलन करण्यात आले,त्यावेळी आम आदमी पार्टीचे विदर्भाचे सदस्य मनोहरजी पवार व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!