बल्लारपूर जुने बसस्थानक परिसरात किराणा दुकानाला आग : लाखोंचा माल जळून खाक
बल्लारपूर जुने बसस्थानक परिसरात किराणा दुकानाला आग : लाखोंचा माल जळून खाक
बल्लारपूर:(वसंत मून)
बल्लारपूर शहरातील जुने बसस्थानक परिसरात हनुमान मंदिर लगत असलेल्या हेमंत कुकरेंजा यांच्या ओम किराणा स्टोर्स या दुकानातुन आज सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास धूर निघत असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी पाहिले असता.
यासंबंधीची सूचना दुकान मालकाला दिली असता जवळपास 15 मिनिटानंतर दुकान मालक आले असता आगीने पेट घेतला असता यामुळे ओम किराणा स्टोर्स चे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती आहे.
यासंबंधी अग्निशमन दलाला माहिती दिली असता त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविले सूत्राच्या माहितीनुसार सदर आग शॉट सर्व्हिस मुळे लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
ऐन दिवाळीच्या तोंडावर शॉट सर्व्हिस मुळे लागलेल्या आगीमुळे ओम किराणा स्टोर्स चे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.
या संदर्भात बल्लारपूर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक आस्थापना मालकांनी फायर सेफ्टी करणे बंधनकारक असतांना अनेक आस्थापना मालक व चालक याकडे साफ दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते व अनेक कारणांमुळे लागणाऱ्या आगीमुळे दुकान मालक व चालकाचे लाखो रुपयांचा नुकसानीला सामोरे जावे लागते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!