महाराष्ट्रातील शिक्षकांची उद्यापासून होणार कोरोना चाचणी

महाराष्ट्रातील शिक्षकांची उद्यापासून होणार कोरोना चाचणी


चंद्रपूर:- राज्यातील सरकारी, अनुदानित तसेच खाजगी व्यवस्थापनांच्या नववी ते बारावी पर्यंत सर्व शाळा आणि त्यांचे वर्ग २३ नोव्हेंबर रोजी सुरू होत आहेत.या पार्श्वभूमीवर मंगळवार (१७ नोव्हेबर पासून राज्यातील लाखो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच शाळेशी संबंधित असलेल्या इतर कर्मचा र्‍यांची कोविंड -१ ९ अर्वात कोरोना चाचणी केली जाणार आहे .राज्यात २४ जूनपासून पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतचे सर्व शिक्षण आतापर्यंत ऑनलाइन पद्धतीने सुरू होते, परंतु राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने शालेय शिक्षण विभागाकडून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, ‘मिशन बिगिन अगेन‘ अंतर्गत राज्यातील सर्व शाळा येत्या काळात टप्याटप्याने सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने चार दिवसांपूर्वी शासन निर्णय जारी केला असून, त्यानुसार येत्या २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग आणि शाळा सुरू केल्या जाणार आहेत. कोविड -१९ अर्थात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागाने या मार्गदर्शक सूचनांमध्ये शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोविड करण्याचे आणि त्यासाठीच्या सूचनांचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशानुसार शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची १७ ते २२ नोव्हेंबर यादरम्यान कोविड -१९ साठीची आरटी पीसीआर चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या चाचणीचे प्रयोगशाळेने दिलेले प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापनास सादर करावे. शाळा व्यवस्थापनाने त्याची पडताळणी करावी आणि त्यानंतरच त्यांना शाळांमध्ये प्रवेश द्यावा, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे . मंगळवारपासून सुरू होत असलेल्या कोविडच्या चाचणीनंतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्यांना शाळा आणि परिसरात येण्यास मज्जाव केला जाणार आहे. तसेच त्यांना डॉक्टरांनी प्रमाणित केल्यानंतरच शाळेत उपस्थित राहण्याची मुभा दिली जाणार आहे. यासाठी सर्व खबरदारी घेण्याची जबाबदारी शाळा मुख्यध्यापकांवर सोपवण्यात आली आहे.
Online 
पब्लिक पंचनामा
https://www.flipsnack.com/public1972/public-panchanama.html

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!