सार्वजनिक बांधकाम विभाग डांबर प्लॅन्टच्या अतिक्रमा वर कार्यवाही करणार तरी कधी

लोकप्रतिनिधी चा दबाव तर नाही ना ?

तालूका - प्रतिनिधी (केवलसिंग जुनी)
 
चिमूर : - चिमुर ते मालेवाडा जाणाऱ्या राज्यमार्गावर मालेवाडा या गावालगत असलेल्या डांबर प्लॅन्टचे वाल कंपाऊंड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर करण्यात आले असून शिवसेना तर्फे सार्वजनिक बांधकाम उप विभागीय अधिकारी यांना या अतीक्रमन याबद्दल निवेदन सुद्धा देण्यात अाले होते.परंतु अाता पर्यंत कोनतीही कार्यवायी डांबर प्लँट कंपनीवर करण्यात आलेली नाही. या अधिकाऱ्यांवर कुणाचा दबाव तर येत नाही ना? अधिकारी हे दबावाखाली काम करीत असल्याची चर्चा रंगली असून नियम हे सर्वांवरच लागू होत असतात मग तो श्रीमंत असो व गरीव बघत नसतात. सार्वजनिक बांधकाम विभाग व डांबर प्लॅन्ट च्या मालकांचे संबध घनीष्ठ आहे असा सुद्धा अंदाज गावकऱ्यांमार्फ़त दर्शविला जात आहे.त्यामुळे या प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत तर नाही ना? परंतु या डांबर प्लॅन्ट मुळे येणाऱ्या - जाराऱ्या जनतेला त्रास होत आहे. जीव धोक्यात घालून वाहतूक  सुरू आहे. राज्य मार्गाला लागून तारेचे कंपाऊंड असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.या डांबर प्लँट ला लागुनच उमा नदी चा मोठा नाला आहे.व या नाल्याचे पाणी मलेवाडा , कारघाटा , सावरगाव ला पिण्यासाठी उपयोगात येत असून प्लँट मुळे व त्यातील दुरीमुळे व डस्ट मुळे पाणी खराब होत चालले आहे. यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात येईल याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्या ठिकाणी अंधा मोड असल्याने येणाऱ्या - जानाऱ्या वाहानाला त्रास होत असते.डांबर प्लॅन्ट चे धुर येणाऱ्या - जानाऱ्या दुचाकी चालकांच्या डोळ्यात जात असल्याने नागरीकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे.या प्लँट मुळे नदी चा पाणी दूषित झाल्याने वन्यप्राणी व गावतील जनतेला धोका निर्माण झाला आहे. प्राण्यांची जिवितहाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.म्हणून या सर्व बाबी लक्षात घेऊन मौका चौकशी करण्यात यावी असी चिमुर च्या जनतेकडून मांगनी होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!