अल्पवयीन बालीकेवर नराधम भावानेच केला अत्याचार

भाऊ बहीणीच्या नात्याचा पडला विसर

भंडारा जिल्हा - प्रतिनिधी ( प्रकाश नाकतोडे )

भंडारा : - लाखांदुर तालुक्यातील दिघोरी पोलिसस्टेशन अंतर्गत येणाऱ्या जैतपुर येथील घटना यात अल्पवयीन बालीकेवर अत्याचार करुन तीला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा किळसवाणा प्रकार लाखांदुर तालुक्यात घडला आहे. दरम्यान तक्रारी वरुन दिघोरी पोलीसांनी एका २१ वर्षीय तरुना विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. प्राप्त माहित नुसार घटनेच्या वेळी सदर बालीकेचे आई  व वडील घरी ऊपस्तीथीत नव्हते याच संधिचा फायदा घेऊन मिथुन बालाजी बगमारे या नराधमाने तीच्यावर अतीप्रसंग केला तसेच ही बाब कुनालाही सांगितल्यास तीला जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही त्या बालीकेने पोलीसांना सांगितले विषेश म्हणजे हि बाब तीचे आई व वडील परत आल्यावर त्यांना समजली बालीकेच्या वडीलांनी या बाबद दिघोरी पोलिसस्टेशनला तक्रार दिली घटना स्थळी उपविभागिय पोलिस अधिकारी कुना जनबंधु यांनी भेट दिली तपासी अधिकारी भाग्यश्री कुळकर्णी यांनी या बाबद चौकशी केली पिडित बालीकेनेही तीच्यावर घडलेला प्रकार कथन केला तक्रारी वरुन दिघोरी पोलीसांनी मिथुन बालाजी बगमारे यांच्या विरुध्द कलम ३७६(अ)(ब)५०६ कलमाअन्वये तसेच सहकलम ३,४,५ (आय)(एम).६ पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढिल तपास साहाय्यक पोलिस निरिक्षक भाग्यश्री कुळकर्णी करित आहे. दरम्यान गावात तणावपुर्ण शांतता आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!