राजुरा तालुका युवासेनेने वाहिली बाळासाहेबांना आदरांजली बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिना निमित्त फळ वाटप

राजुरा तालुका युवासेनेने वाहिली बाळासाहेबांना आदरांजली
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिना निमित्त फळ वाटप

राजुरा :(धनंजय पांढरे )
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन. त्या निमित्त राज्यभरातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. ८०% समाजकारण २०% राजकारण अंतर्गत राजुरा तालुका युवासेने कडून हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिना निमित्त त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पुष्पांजली अर्पण करीत मौन पाळण्यात आले. त्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे, युवासेना जिल्हा समन्वयक निलेश बेलखेडे, युवासेना उपजिल्हा प्रमुख प्रणित अहिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालय येथे फळ वाटप करण्यात आले.

यावेळी युवासेना तालुका प्रमुख आकाश राठोड, युवासेना तालुका समन्वयक प्रविण पेटकर, उपतालुका प्रमुख बंटी मालेकर, सास्ती येथील उपसरपंच कुणाल कुडे, युवा नेतृत्व वतन मादर, स्वप्नील मोहरले, बुटले, बंटी पिपरे, अतुल खनके, गणेश चोथाले, गोपाल शिंदे, सुनील गोरकर, गौरव चन्ने, शुभम भोयर, निखिल गिरी, अंकुश बुटले, श्रीनाथ बोल्लुवार, तनय ढवस, सौरभ चन्ने, अक्षय लांडे, आशिष मालेकर, मयुर गौहणे, शिवचरण जाधव, मयुर बावने, ओम वांढरे, निखिल पिपरे आदी युवासैनिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!