नवोदयच्या सहावी प्रवेश परीक्षा प्रक्रियेचे ऑनलाइन अर्ज सुरु

नवोदयच्या सहावी प्रवेश परीक्षा प्रक्रियेचे ऑनलाइन  अर्ज  सुरु

तळोधी (बा.) :(प्रतिनीधी) 
नवोदय विद्यालयातील सन २०२९-२२ मधील इयत्ता सहावी प्रवेश परीक्षेचे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून प्रवेश परीक्षेचा फॉर्म भरण्याची अंतिम तिथि १५ डिसेंबर २०२० पर्यंत आहे. तसेच प्रवेश परीक्षा १० एप्रिल २०२१ रोजी होणार असल्याची माहिती प्राचार्य जवाहर नवोदय विद्यालय चंद्रपुर यांनी दिली आहे.

नवोदय विद्यालायाची सामान्य वैशिष्टे, परीक्षेसाठी पात्रता सविस्तर अधिसूचना इत्यादि परिक्षे संबंधी अधिक माहिती तसेच प्रवेश परीक्षेचे ऑनलाइन अर्ज नवोदय विद्यालय समितीच्या

www.ravodaya.gov.in किंचा http://cbseitms.in/nvsregnindex.aspx या वेब पोर्टलवर निशुल्क भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. ऑफलाइन अर्ज स्वीकारण्यात येणार नाही याची सर्व सम्बंधितानी नोंद घ्यावी, अर्ज करण्यापूर्वी माहिती पत्रकातील सुचना काळजीपूर्वक वाचाव्यात व नोंदणी पूर्ण झाल्याची खात्री करून भविष्यातील संदर्भासाठी प्रवेश अर्जाची प्रिंट घ्यावी तसेच अर्ज भरन्यासंदर्भात काही अड़चन असल्यास प्राचार्य जवाहर नवोदय विद्यालय चंद्रपुर ०७१७९- २३६५४७ या हेल्पलाइन नंबरवर कार्यालयीन वेळत संपर्क साधावा. चंद्रपुर जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र विदयार्थ्यानि ऑनलाइन प्रवेश अर्ज भरून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य जवाहर नवोदय विद्यालय चंद्रपुर यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!