पुलाचे स्वप्न भंगणार का ?
नेरी-सोनेगाव मार्ग : घोषणा हवेत असल्याची नागरिकांत चर्चा
शंकरपूर - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
शंकरपूर : - नेरी-सोनेगाव पेठ मार्गावर उमा नदी आहे. मात्र नदीवर पूल नसल्याने शेतकऱ्यांना जाण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच पुलाअभावी 4 किमी चा फेरा मारुन चिमूर या तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत आहे.
नेरी - सोनेगाव- चिमूर हा अत्यंत महत्वाचा व तालुक्याला कमी अंतराने जुळणारा मार्ग आहे. चिमूर येथील प्रख्यात घोडा यात्रेला पायी जाण्याचा मार्ग म्हणून याची ओळख आहे . या मार्गावर असणाऱ्या उमा नदीवर पूल व्हावा याकरिता अनेक वर्षापासून मागणी करण्यात येत होती. त्यामुळे या रास्त मागणीचा विचार करून सोनेगाव ते नेरी, उमा नदीवर पूल व पुला पासून नेरी येथील बाजार चौकापर्यंत रस्ता मंजूर करण्यात आला अशी घोषणा राजकीय पुढाऱ्यांनी केली. यात सोनेगाव नेरी रस्त्याच्या कामाला चांगली सुरुवात होवून रस्त्यखचे बांधकाम झाले . तर नदी पासून ते बाजार चौक रस्त्यालाही सुरवात होवून सिमेंट रस्ता ही तयार झाला मात्र अजूनपर्यंत उमा नदीवरील पुलाच्या बांधकाला प्रत्यक्षात सुरवात झाली नाही. त्यामुळे हि पोकळ तर घोषणा नाही ना अशी चर्चा नागरिकांत सूरु आहे.
या अगोदर या नदीच्या पाण्याच्या प्रवाहात जनावरांसह माणसेही वाहल्याच्या घटना घडल्या असूनही पूल न बनल्यामुळे जीवाला धोक्यात घालून नागरिकांना या नदीच्या पात्रातुन पावसाळ्यात वाट काढावी लागणार आहे. मात्र प्रशासनाला अजूनही गंभीर दिसत नाही त्यामुळे जनप्रतिनिधींनी या बाबीकडे आवर्जून लक्ष घालून पुलाचे झाले तरी काय यावर नागरिकांना माहिती द्यावी अन्यथा पुलाची घोषणाच चोरीला गेली म्हणायची वेळ नागरिकांवर येईल.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!