२६ नोव्हेंबर च्या देशव्यापी सार्वत्रिक संपात महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचारी सहभागी होणार'

जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )               

चंद्रपूर : - केंद्र सरकारने नुकतेच अनेक कामगारांना संरक्षण करणारे कायदे रद्द केले आहेत. कंत्राटीकरनाला सरकारचे प्रोत्साहन आहे. बी एस एन एल, रेल्वे, विमान या सारखे सार्वजनिक उद्योग खाजगी  भांडवलदारांना विकले जात आहेत.  लॉक डाऊन काळात स्थलांतरित मजूर उपाशी मरत होते. मागील महिन्यात केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यामुळे शेती व शेतकरी संकटात सापडले आहेत .सरकारच्या या धोरणांमुळे देशातील कष्टकरी समूहांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. देशातील   संयुक्त कामगार संघटना कृतीसमितीच्या वतीने २६ नोव्हेंबर २०२० रोजी सरकारच्या धोरणांविरुद्ध  सार्वत्रिक  संप पुकारला आहे.
         या आंदोलनात चंद्रपुर जिल्ह्यातिल  अंगणवाडी कर्मचारी सहभागी होणार आहेत, अशी माहिती अंगणवाडी कर्मचारी सभेचे जिल्हा अध्यक्ष इम्रान कुरेशी यांनी दिली आहे. यावेळी केंद्र व राज्य सरकार कडे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा मिळावा, रिक्त जागांवर त्वरित भरती करावी, समान कामाला समान दाम या तत्वप्रमाणे मिनी अंगणवाडी सेविकांना पूर्ण अंगणवाडी सेविकांइतके  मानधन द्यावे, सर्व विमा योजनांचे त्वरित लाभ मिळावेत, मोबाईल कामाचा विशेष भत्ता मिळावा, सर्व क्षेत्रातील कंत्राटी कामे बंद करून कायमस्वरूपी कामगार नेमावेत इत्यादी  मागण्या करण्यात येतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!