नागरिकांची नेटवर्क च्या शोधात भटकंती
पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
पळसगांव (पि) : - चिमूर तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या पळसगांव,पिपर्डा परिसरातील आयडिया,व्होडाफोन सेवा डोकेदुखी ठरली आहे.पळसगांव येथे मोठा भ्रमणध्वनी मनोरा उभारण्यात आला आहे. मात्र सेवा योग्य दर्जाची मिळत नसल्यांनी हा मनोरा कुचकामी ठरला आहे.यामुळे ग्राहकांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. ग्राहक त्रस्त झाले आहेत.यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. नेटवर्क क्षेत्राबाहेर असल्याचे सांगत असल्यामुळे लोकांचा मनस्ताप होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!