केंद्र शासनाच्या धोरणा विरूध्द महाविकास आघाडीचे निषेध आंदोलन

केंद्र शासनाच्या धोरणा विरूध्द महाविकास आघाडीचे  निषेध आंदोलन


मूल (अमित राऊत )

केंद्रातील मोदी सरकारने पारीत केलेल्या कृषी व कामगार विरोधी कायदे आणि उत्तर प्रदेश मधील हाथरस येथे घडलेल्या अमानवी कृत्याची माहीती घेण्यासाठी गेलेल्या गांधी कुटुंबीयांना केलेली धक्काबुक्की या सर्व घटना जनतेच्या न्याय हक्कावर गदा आणणाऱ्या आहेत, त्यामुळे या घटनांचा निषेध म्हणुन राज्यातील महाविकास आघाडी सरकार मधील पक्षाच्या वतीने आज तहसिल कार्यालय मूल समोर तहसीलदार यांना निवेदन देऊन  जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. 
     जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा स्थानिक काँग्रेस नेते संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी कांग्रेसचे मूल तालुका अध्यक्ष घनशाम येनूरकर,  पंचायत समिती मूल चे सदस्य संजय मारकवार, नेते  राकेश रत्नावार, संदीप  कारमवार   पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व  ग्रामीण भागातील शेतकरी  मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!