लाकडाऊन ते अनलाक काव्य स्पर्धेत विशाल मोहुर्लेचा प्रथम क्रमांक

लॉकडाऊन ते अनलॉक काव्य स्पर्धेत विशाल मोहुर्ले यांनी प्रथम क्रमांक पटकावला


अखिल भारतीय  मराठी साहित्य परिषद पुणे ने लॉकडाऊन ते अनलॉक काव्य स्पर्धा आयोजीत केली होती


ग्रामिण भागातुन सुंदर काव्य सादरीकरण करणारा पहिला मानकरी ठरला






जितेंद्र पेंदाम 
उपसंपादक 


ग्रामिण भागातील कवित्रीना आपली कविता प्रसारीत करण्यास वाव मिळत नसल्याने अनेक ग्रामिण भागातील लेखक व कवित्री उपेक्षित असतात.
आपल्या भावना आपले लेख प्रकाशित पासुन वंचित असतात.
ग्रामिण भागात ही अनेक लेखक कवित्री असतात पण व्यास पिठ नसल्याने अनेक लेख व कविता अप्रकाशित आहेत.
प्रसंगी संधी मिळाली तर संधीचं सोनं करतात .
अशीच संधी दिली अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे द्वारा लॉकडाऊन ते अनलॉक याविषयावर स्वलिखित काव्य स्पर्धा आयोजीत केली होती.
यामध्ये स्वलिखित काव्य स्वताच सादरीकरण करायचं होत.यात व्हिडीयो क्लीप टाकायची होती.
    अशाच संधीचं सोनं केलं चंद्रपुर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील पवनपार येथील  कवी विशाल मोहुर्ले यांनी आयोजित काव्य स्पर्धेत सहभाग घेतला होता.
 या काव्य स्पर्धेत अनेक  लेखक व कवित्रीने सहभाग घेतला होता.
परंतु विशाल मोहुर्ले यांची कविता अव्वल ठरली.


कित्येक पावसाळे गेले  पण नाही पाण्यात भिजली
लाॅकडाऊन झाला तसा आमच्या घरची चुल विझली....

उन्हाळे, पावसाळे आणि उपासमारीही येऊन गेली
कोरोणा विषाणूंच्या प्रसाराने जिवनाची होळी झाली...

रोज आमची चुल बाप-मायेच्या मजूरीवर पेटायची
उपाशी असणाऱ्या पोटाला रोज भाकरी भेटायची...

लाॅकडाऊन संपत नाही, रोजगार भेटत नाही म्हणून
माझा बाप सदा नशिबाला दोष देताना मला भेटतो...

खोट सांगत नाही आणि खरं लपवत नाही...
कारण.. मीसुद्धा या बावळट नशिबालाच ठोकतो...

पेटणार कधी चुल आणि मिटणार कधी लाॅकडाऊन
म्हणून रोज माझी माय मला निरागपणे विचारते...

आपल्या उपाशी झोपणाऱ्या लेकरासाठी ती माऊली
चुल पेटत नाही म्हणून.. दारोदार अन्नासाठी भटकते....
कवि- विशाल मोहुर्ले
मो. ७०८३३३५०५३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!