प्रहार जनसक्ती पक्ष भंडारा यांचे जिल्हाधिकारी भंडारा मार्फत पंतप्रधान यांना पाठविण्यात आले निवेदन

भंडारा/गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार यांचे निवास स्थान ताब्यात घेण्या बाबद देण्यात आले निवेदन

भंडारा जिल्हा - प्रतिनिधी ( प्रकाश नाकतोडे )

भंडारा : - नगरपंचायत लाखांदूर येथील ११७  लाभार्थ्यांना पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करून आदेश बांधकामाचे  आदेश देण्यात आले होते तीन ते चार महिन्यांमध्ये लाभार्थ्यांना एक लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले व उर्वरित दीड लक्ष रुपयाचे  अनुदान  घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर  देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते  लाभार्थ्यांनी घरकुलांचे बांधकाम करताना आपल्या ऐपतीप्रमाणे दुकानदाराकडून बांधकाम साहित्य ,ऊधार ऊसने व्याजाने पैसे काढुन सामान खरेदी केले मात्र लाभार्थ्यांच्या घरकुलाचे  बांधकाम पूर्ण होऊन सुद्धा दहा महिन्याचा कालावधी लोटून उर्वरित दीड लाख रुपयाचे अनुदान अजून पर्यंत मिळाले नसल्यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. उर्वरित घरकुलाच्या अनुदानासाठी शासनाकडे दहा महिन्यापासून पत्रव्यवहारात द्वारे मागणी करून सुद्धा लाभार्थ्यांना कुठले अनुदान उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले त्यामुळे नाईलाजाने घरकुल लाभार्थ्यांना नगर पंचायत लाखांदूर समोर उपोषणाला बसावे लागले परंतु शासनाने उपोषणकर्त्यांची कुठलीही दखल घेतली नाही ही बाब प्रहार कार्यकर्त्यांच्या लक्षात आली असता उपोषण मंडपाला भेट देऊन ३० ऑक्टोंबर २०२० पर्यंत घरकुल लाभार्थ्यांचे पैसे मिळाले नाही तर २ नोव्हेंबर २०२० रोजी साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार कथा विधानसभा अध्यक्ष यांच्या घरासमोर बेसनाचे झाड लावून त्याच दिवशी भंडारा गोंदिया शेती खासदार यांचे भंडारा येथील घराला प्रहारचे कार्यकर्ते व घरकुल लाभार्थी ताब्यात घेतील अशा मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी साहेब भंडारा मार्फत पंतप्रधान यांना पाठविण्यात आले निवेदन देतेवेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अंकुश भाऊ वं जारी विनोद वंजारी,मंगेश वंजारी,होमेश राऊत, सचिन बारई प्रहार कार्यकर्ते  व घरकुल लाभार्थी वासुदेव तोंडरे ,रफीक शेख ईत्यादि उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!