नवरात्री :::स्त्रीशक्तीचा जागर

नवरात्री :::स्त्रीशक्तीचा जागर

         १७ ऑक्टोबर पासून देवीचे नवरात्र सुरू झाले आहे. या नऊ दिवसांत श्री दुर्गादेवीचे तत्व कार्यरत असते.पहिले तीन दिवस श्री महांकाली,दुसरे तीन दिवस श्री महालक्ष्मी व तीसरे तीन दिवस श्री महासरस्वती देवींचे तत्व कार्यरत असते. या नऊ दिवसांत देवीची उपासना करुन आपल्याला तिची शक्ती मिळवायची आहे. माता जीजाबाई सारखे बनुन श्री शिवाजी महाराज तयार करायचे आहेत. राणी लक्ष्मीबाई बनुन अन्यायाविरुद्ध लढुन राष्ट्राला वाचवायचे आहे.राणी अहिल्याबाई होळकर यांच्यासारखे सुव्यवस्थीतपणे राज्य सांभाळण्याची कला आपल्याला अवगत करावयाची आहे. असे अनेक उदाहरणे आपल्याला देता येईल.
         आज स्त्री प्रत्येकच क्षेत्रात समोर गेली आहे.रिक्षा चालवण्यापासुन तर वीमान चालवण्यापर्यंत इतकेच नव्हे तर मंगळ ग्रहावर यान पाठवण्यात सुद्धा स्त्रीयांचाच सहभाग आहे.
     म्हणुनच या नवरात्रीत आपण संकल्प करून राष्ट्रासाठी काहितरी करून स्त्रीशक्तीची जाणीव करून देऊ या. तर चला तर मग या नवरात्रीत पहिले तीन दिवस श्री महाकाली देवीची उपासना करुन देशातील भ्र् ष्टाचार,बलात्कार , भोंदूगिरी यांसारख्या अनेक राक्षसांविरूद्ध लढा देऊ या. दुसरे तीन दिवस श्री महालक्ष्मी देवीची उपासना करुन आपल्या जवळ असलेल्या पैशाचा विनियोग चांगल्या पद्धतीने कशाप्रकारे करायचा हे शीकुया आणि तीसरे दिवशी श्री महासरस्वतो देवीची उपासना करुन चांगले ज्ञान जगाला देऊ या व आपल्या मुलांना सुद्धा चांगल्या संस्काराचे ज्ञान देऊन त्यांचे भविष्य उज्ज्वल बनवु या.
   { श्री दुर्गादेव्यै नमः }
सौ. भारती कोंतंमवार, चंद्रपूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!