समाजोपयोगी नवरंग - कुमुदिनी भोयर
मुल :(सचिन वाकडे)
संपूर्ण विश्व विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर करुन चंद्रावर वसाहत निर्माण करण्याची तयारी करीत आहे तर दुसरीकडे भारतात महिलांना दुयम वागणूक दिली जात असल्याचे वेळोवेळी प्रकर्षाने दिसून येते. भारतात व्यक्तीस्वातंत्र असले तरी महिलांवर काहि बंधने लादलेली पहावयास मिळते. हि लादलेली बंधने झुगारुन आपापल्या आवडिचे, विविध क्षेत्रात कार्यरत असलेले रणरागीणींनी समाजात आपले वेगळे अस्तित्व निर्माण करणारे मुल तालुक्यातील युवती तसेच महिला यांच्याविषयी पब्लिक पंचनामामध्ये खास नवरात्र निमित्य विशेष लेखमाला प्रकाशित करण्यात येत आहे.
मुल येथील उदयोन्मुख प्रथम महिला पत्रकार तसेच संगीतकलाप्रेमी कु. कुमुदिनी शरद भोयर हे नाव आज तालुक्यातील नागरिकांसाठी परिचयाचे आहे. कुमुदिनीची आई गृहिणी तर वडील नगर परिषद कर्मचारी असून एक लहान भाऊ असलेल्या एका आनंदी व सुखी परिवारात कुमुदिनीचा जन्म झाला. बालपणापासून संगीत क्षेत्रात आवड असणाऱ्या कुमुदिनीने आपले शिक्षण संगीत विषयातच पुर्ण करित आहे.गायन, वादन, वाचन, लेखन करणे हे आवडीचे विषय असले तरी चंद्रपूर जिल्हयातील मुल सारख्या शहरात प्रथम महिला पत्रकार होण्याचा बहुमान कुमुदिनीला मिळाला आहे.
अनेक अन्यायाला वाचा फोडणाऱ्या कुमुदिनीने पत्रकारिता क्षेत्रात काम करित असतांना जेव्हा धाकटया बहिनीला आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्या दोषींना शिक्षा व्हावी व त्यासाठी योग्य तपास व्हावा, असे प्रयत्न करित असतांना तेव्हा अनेक संकटांना सामोरे जावे लागले. या काळात अनेक समस्याहि आल्या. आयुष्याच्या वळणावर आलेल्या प्रत्येक संकटावर मात करत, यशाची एक एक पायरी चढत आज एक यशस्वी पत्रकार तसेच गोड गळयाची गायीका मुल शहराला लाभली.
पत्रकारिता तसेच संगीत क्षेत्रात आपले स्वताचे वेगळेपण जपणारे नाव असावे असे प्रत्येकाला वाटत असते. आणी तसे वाटण्यात काहि गैर नाहि. पत्रकारितेतून जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावणे तसेच अन्यायाला वाचा फोडून न्याय मिळवून देणे हे प्रथम उदिष्ट असलेल्या कुमुदिनीला स्वताचा गायनातून लोकांना आनंदी करायचे आहे. लोकांच्या भावना ह्या आपल्या समजून गित गायनातून त्यांचे दुख, वेदना, कुमुदिनीला हलके करायचे आहे. मार्ग मोठा व खडतर असला तरी त्यावर चालायची मनोमन तयारी केलेल्या कुमुदिनीला पब्लिक पंचनामाकडून मनपुर्वक शुभेच्छा.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!