समाजोपयोगी नवरंग — रविना प्रभाकर धोटे, चित्रकला
मूल (कुमुदिनी भोयर)
संपूर्ण विश्व विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर करुन चंद्रावर वसाहत निर्माण करण्याची तयारी करीत आहे तर दुसरीकडे भारतात महिलांना दुयम वागणूक दिली जात असल्याचे वेळोवेळी प्रकर्षाने दिसून येते. भारतात व्यक्तीस्वातंत्र असले तरी महिलांवर काहि बंधने लादलेली पहावयास मिळते. हि लादलेली बंधने झुगारुन आपापल्या आवडिच्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेले रणरागीणींनी समाजात आपले वेगळे अस्तित्व निर्माण करणारे युवतीविषयी पब्लिक पंचनामामध्ये खास नवरात्र निमित्य विशेष लेखमाला प्रकाशित करण्यात येत आहे.
मनात दुर्दम्य इच्छाशक्ती असली, तर सर्व ध्येय सहज गाठता येतात. पण त्यासाठी अपार मेहनत घ्यायची, मनाशी खुणगाठ बांधणे आवश्यक आहे. मुलसारख्या शहरातील युवतीने आज चिलकला क्षेत्रात कुणीही गाॅडफाॅदर नसतांना, केवळ मेहनत व कौशल्याचा बळावर आपल्या कामाशी प्रामाणिक राहुन, आपले पाय घट्ट रोवू पाहतेय.
लहान पनापासुनच चित्रकलेत आवड असल्याने अल्पावधीतच या क्षेत्रात स्वताची अमीट छाप पाडणारी मूल शहरातील या कलावंत युवतीचे नाव आहे रविना प्रभाकर धोटे. राविनाचे वडील नवभारत विद्यालयात प्राध्यापक आहेत आणि आई गृहिणी आहे. लहान बहिण बी.ए.फायनला आहे तर धाकटा भाऊ अकरीत शिक्षण घेत आहे.
रविनाचे प्राथमिक शिक्षण इतर सर्वसामान्य मुलींप्रमाणेच मूल येथिल जिल्हा परीषदेच्या मराठी शाळेतूनच झाले. पहिली—चौथीचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मूल, पाचवी ते सातवी पर्यंत गडचिरोली ,माध्यमिक शिक्षण नवभारत विद्यालय मुल येथे झाले. अकरावी ते बारावी नवभारत विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मूल, पदवीचे शिक्षण सिंदेवाही येथिल सर्वोदय महाविद्यालयात झाले.
रविनाने एक वर्ष कालावधीचे अभास्क्रम पुर्ण केलेला आहे. ती मूल येथिल सी.बी.एस.सी.कॉन्वेंटला दोन वर्ष चित्रकलेची शिक्षिका म्हणुन कार्यरत होती. अनेक विद्याथ्र्यांना त्यांनी चित्रकलेत पारंगत केले आहे.आताही अनेका विद्याथ्र्यांना ती चित्रकलेत संप्रेशन करीत आहे.
घरातील सर्वांना चित्रकलेत खुप रस आहे. रविनाला चित्र तयार करणे, रांगोळी चित्र आणि भिंतीचित्र बनविण्याची आवड आहे. सुरूवातीला चित्रकला अवघड जात असल्याने थोडा त्रास झाला. मात्र सरावाने हळुहळु सर्व सोपे होत गेले. एखाद्या विषयावर चित्र तयार करतांना चेह—यावर सुखाचे भाव येतात. आणि त्यातुन आनंद मिळते, महत्वाचे म्हणजे आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. असे ती सांगते. चित्रकलेतुन स्वताची ओळख तयार होत गेली. या क्षेत्रात आणखी बरेच काही शिकायचे आहे. स्वताचे कौशल्य तयार करायचे आहे असे ती सांगते. स्वत: या क्षेत्रात मोठे बनून चित्रकलेत रस असना—या ग्रामिण भागातील मुलां मुलींना प्रोत्साहित करायचे आहे.
चित्रकला क्षेत्रात आपले स्वत:चे वेगळेपण जपणारे नाव तसेच स्वत:चे अस्तित्व असावे, असे प्रत्येकाला वाटत असते. आणी तसे वाटण्यात काही गैर नाही. तीने निवडलेला मार्ग मोठा व खडतर असला, तरी त्यावर चालायची मनोमन तयारी केलेल्या रविनाला पुढील वाटचालीकरीता पब्लिक पंचनामाकडून मनपुर्वक शुभेच्छा...!






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!