समाजोपयोगी नवरंग :अंकिता रामशेट्टीवार
सचिन वाकडे, मुल
संपूर्ण विश्व विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर करुन चंद्रावर वसाहत निर्माण करण्याची तयारी करीत आहे तर दुसरीकडे भारतात महिलांना दुयम वागणूक दिली जात असल्याचे वेळोवेळी प्रकर्षाने दिसून येते. भारतात व्यक्तीस्वातंत्र असले तरी महिलांवर काहि बंधने लादलेली पहावयास मिळते. हि लादलेली बंधने झुगारुन आपापल्या आवडिचा, विविध क्षेत्रात कार्यरत असलेले रणरागीणींनी समाजात आपले वेगळे अस्तित्व निर्माण करणारे मुल तालुक्यातील युवतींविषयी पब्लिक पंचनामामध्ये खास नवरात्र निमित्य विशेष लेखमाला प्रकाशित करण्यात येत आहे.
आपल्या एकाग्रतेच्या भावविश्वात रमून मातीला आकार देत, हवी ती मूर्ती घडविणारी महिला मूर्तिकार अंकिता मारोती रामशेट्टीवार हे नाव मुल तालुक्याला सुपरिचित आहे. अंकिता ही चंद्रपूर जिल्ह्यात आपल्या मुर्तीकलेची छाप पाडणारे प्रसिद्ध चेपाजी पेंटर यांची नात आहे. पाच सदस्य असलेल्या या परिवारात आई, वडील, भाऊ, वहिनी, हे सर्वच मुर्तीकलेत निपुण आहेत. आजोबापासून वडिलांकडे तर वडिलांपासून अंकिताकडे मुर्तीकलेचा हा वारसा चालत आलेला आहे. चेपाजी पेंटरपासून सुरु झालेला हा वारसा आज अंकिताच्या रूपाने तिसरी पिढी चालवीत आहे.
फौंडेशन, एटीडी तसेच इंटेरीअर शिक्षण घेतलेल्या अंकिताला बालपणापासूनच चित्रकला त्यात प्रामुख्याने मूर्तीकलेची आवड होती. जन्मापासून घरी वडिल व आजोबांची मूर्तीकला पाहता पाहता ती लहानाची मोठी झाली. मूर्ती बनविण्यात अंकिताला आवड असली तरी चित्र काढणे, संगीत ऐकणे, नृत्य तसेच कविता लिहिण्यातही विशेष आवड आहे.
मुर्तीकलेत काम करित असतांना अंकिताला काहि समस्या किव्हा संकट आलेले नसले तरी प्रकृती अस्वस्थामुळे मन मात्र कधीतरी विचलित व्हायचे. ह्या क्षेत्रात एक ठराविक लक्ष्य असते, ज्याच्या अचूक वेध घ्यायचा असतो.
प्रकृती अस्वस्थामुळे आयुष्यात केलेली मेहनत आणि त्यात मिळालेले समाधान हे सदैव उपयोगी पडणारे आहे. कुठलिही गोष्ट विकसित करतांना शारिरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असावे लागते. वेळेनुसार परिस्थिती कितीही बिकट असली तरी त्या कामात असलेले समर्पण, माणसाची जिद्द हि त्याला यशाच्या शिखरावर पोहचवतो. आजतागायत आयुष्यात मिळालेले यश व मिळालेले गुण यांची सांगड घालून खुप सामोर जायचे असल्याचे अंकिता आवर्जून सांगते. भविष्यात अंकिताला यशस्वी मुर्तीकार व्हायचे असून प्रत्येकाला कलेची जाणिव करून द्यायची आहे.
लोकांच्या भावना, त्यांच्या आवडी निवडी ह्या आपल्या समजून मुर्तीकलेतून त्यांचे दुख, वेदना, अंकिताला हलके करायचे आहे. येतांना निशब्द असलेले ओठ मुर्ती नेताना मात्र मुर्ती पाहून त्यांच्या ओठावर स्मीतहास्य फुलवायचे आहे. मार्ग मोठा व खडतर असला तरी त्यावर चालायची मनोमन तयारी केलेल्या अंकिताला पब्लिक पंचनामाकडून मनपुर्वक शुभेच्छा.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!