गांधी सप्ताह उपक्रमा निमित्य जुनोन येथे वेगवेगळे उपक्रम व स्पर्धेचे आयोजन जुनोन गावातील अभ्यास वर्गाचा उपक्रम
गांधी सप्ताह उपक्रमा निमित्य जुनोन येथे वेगवेगळे उपक्रम व स्पर्धेचे आयोजन जुनोन गावातील अभ्यास वर्गाचा उपक्रम
राजुरा : (रोशन येवले)
सर्वोदय शिक्षण मंडळ द्वारा संचालित सुशिलाबाई रामचंद्रराव मामिडवार कॉलेज कॉलेज ऑफ सोशल वर्क , पडोली,चंद्रपूर अंतर्गत गेल्या 30 वर्षापासून महात्मा गांधी जयंतीनिमित्त सप्ताह संपन्न करीत आहे. त्याअंतर्गत प्रभात फेरी, जनजागृती दिंडी ,आरोग्यविषयक कार्यक्रम ,रक्तदान शिबिर, कायदेविषयक मार्गदर्शन ,कृषी विषयक मार्गदर्शन ,इत्यादी कार्यक्रम महाविद्यालयाच्या माध्यमातून दरवर्षी व्हायचे परंतु covid-19 मुळे शाळा महाविद्यालय बंद असल्या कारणाने महाविद्यालया च्या प्राचार्य डॉ सुनिल साकूरे यांच्या मार्गदर्शन व नियंत्रणाखाली महाविद्यालयाचे फेसबुक पेज वरून फेसबुक लाईव्ह कार्यक्रम सतत आठ दिवस विविध व्याख्याने आयोजित करण्यात आली. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना सुद्धा महाविद्यालयाकडून आव्हान करण्यात आले .ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी वास्तव्याच्या ठिकाणी राहून आपल्या गावांमध्ये लोकसहभागातून आपल्या परीने जसे जमेल तसे कार्यक्रम करावे. व covid-19 सर्व नियम पाळून कार्यक्रम पार पडावे असे आव्हान महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी केले.
त्या आव्हानाला स्वीकारून महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक व BSW च्या द्वितिय वर्षाचा विद्यार्थी श्री . प्रेम जरपोतवार या विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम आपल्या गावांमध्ये घेतले. गावातिल वाचनालयात 1 वर्षा पासून विद्यार्थ्याना ज्ञानाचे धडे देत आहे. त्याच्या उपक्रमाचा फायदा कोरोना संकटात महत्वाचे ठरले. सगळ्या शाळा बंद असताना विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रेरित केले व शाळा बंद असल्यामुळे पर्याय उपलब्ध करून दिला .विद्यार्थ्यासाठी महात्मा गांधी जयंती सप्ताह निमित्त रुक्षरोपन अभियान ,कोरोना जनजागृती साठी पोस्टर बनवून गावात लावणे, निबंध स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, वकृत्व स्पर्धा( महात्मा गांधी ) ग्रामस्वच्छता अभियान, या निमित्त कार्यक्रम सप्ताहामध्ये श्री. प्रेम जरपोतवार या विद्यार्थ्यांनी आपल्या गावासाठी ठेवली होती या स्पर्धा मध्ये क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी बक्षीस जुनोना गावच्या तंटामुक्ती अध्यक्ष सौ चंदाताई देवगड, जिल्हा परिषद शाळेतील मुख्याधापक श्री आत्राम सर व शिक्षक, मॅजिक बस संस्थेचे sso मंगेश रामटेके सर यां सगळ्या कडून त्यांनी मिळवून दिले.बक्षीस वितरण कार्यक्रमा साठी जिल्हा परिषद शाळेतील मुख्याधापक श्री आत्राम सर, तंटामुक्ती अध्यक्ष सौ चंदाताई देवगड, सुशीलाबाई रामचन्द्रराव मामीडवार समाजकार्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. सुभाष गिरडे सर उपस्तिथ होते व विद्यार्थ्याना मार्गदर्शन केलं.व प्रेम जरपोतवार च्या उपक्राला कौतुक करून शुभेच्या देऊन प्रोत्साहित केलं.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!