एफ. ई. एस. गल्स कॉलेज मध्ये गांधी जंयती साध्या स्वरुपात साजरी

एफ. ई. एस. गल्स कॉलेज मध्ये गांधी जंयती साध्या स्वरुपात साजरी

प्रतिनिधी:- कुमुदिनी भोयर



एफ.ई.एस.गल्स काॅलेज, चंद्रपुर येथे आज दिनांक २ आक्टोबर २० ला राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी  यांच्या 151व्या तसेच  स्व.पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या 116 व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी फिमेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड  विजय मोगरे व सचिव अॅड  पूरूषोत्म सातपुते व महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. सरोज झजाळ विचारमंचावर उपस्थित होते. रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डाॅ राजेंद्र बारसागडे ,प्रा.डाॅ. मिना गाडगे यानी कार्यक्रमाचे आयोजन केले. प्रथमता संस्थेचे अध्यक्ष अॅड  विजय मोगरे व सचिव अॅड पुरूषोत्तम सातपुते व प्राचार्य  डाॅ सरोज झंजाळ यानी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला सुतमाला अर्पण करण्यात आले.  कार्यक्रम प्रसगीं अॅड मोगरे यानी महात्मा गांधीजीच्या व लाल बहादुर शास्त्री यांच्या विचारावर प्रकाश टाकला कार्यक्रमाचे संचालन  रासेयो कार्यक्रम  अधिकारी प्रा डाॅ बारसागडे यानी केले असून कार्यक्रमास,प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!