पवनपार व पवना येथील तपासनिला विरोध
पवनपार व पवना येथील तपासनिला विरोध
माझे कुटूंब माझी जबाबदारी अंतर्गत तपासनी सुरू
जितेंद्र पेंदाम
पवनपार
सिंदेवाही तालुक्यातील पवनपार व पवना येथील नागरीकांची माझे कुटूंब माझी जबाबदारी अंतर्गत तपासनी सुरू केली आहे.
आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी व त्यांची टीम ने गावा गावात जावून प्रत्येक कुटूंबातील व्यक्तीची आक्सिमिटर व थर्मल स्कैनिंग ने आरोग्य तपासनी सुरू केली असतांना काही नागरीक चांगला प्रतीसाद देत आहेत तर काही नागरीक विरोध दर्शवित असल्याचे चित्र निर्मान झाले आहे.
गेल्या दोन तिन दिवसापासून पवनपार व पवना येथील नागरीकांची तपासनी करीता आरोग्य टिम येत आहेत. परंतू नागरीकांच्या विराधामुळे तपासनी होवू शकत नाही.
नागरीक तपासनी करू देत नसल्यामुळें आरोग्य प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे.
तपासनी होत नसल्याने वरिष्ट अधिकारी ही या गावात जावून भेट देत असुन सुद्धा नागरीक मानायला तयार नसल्याने येथील आरोग्य तपासनी खोंळबिली आहे.
तपासनिल विरोध करण्याचे कारन शोधले असता जनजागृतीचा अभाव , योग्य माहीती दिली जात नसल्याचे नागरिकांकडून सांगितल्या जात आहे .
तपासनी करने म्हणजे कोरोना ची भिती अशी येथील नागरकांची धारना झालेली आहे.
येथील ग्रामपंचायतने पुढाकार घेने महत्वाचे असतांना ग्रामपंचायतीते पदाधिकारी मात्र याबाबत उदासिन आहेत.
वरिष्ट अधिकारी येवुन पवनपार येथे तलाठी कार्यालयात ग्रामपंचायतचे पदाधिकारी यांच्या सोबत मिटींग घेतली होती. परन्तु उपयोग झाला नाही.
आरोग्य प्रशासनाविषयी येथील जनता नाराज आहे.कारन पवनपार हे गाव मध्यवर्ती ठिकान परीसरातील आहे.
पवनपार येथे उपकेंद्र आहे. या उपकेंद्रात पवना, सामदा,टेकरी,कन्हाळगाव ही गावे येतात.
या उपकेंद्रात कायम स्वरूपी आरोग्य कर्मचारी नाही आहे. त्यामुळे येथिल जनतेला साधा ताप आला तरी काही व्यवस्था नाही.
फक्त काम असला की येथे कर्मचारी येतात किंवा वरिष्टांकडून पत्र आले तरच येथे कर्मचारी येतात.ही बाब प्रशासनाच्या निदर्शनात आनुन देवून सुद्धा यावर काहीच कारवाई होत नसल्याने येथील नागरीक नाराज असल्याचे बोलले जात आहे.
गुंजेवाही येथे प्राथमिक उपचार केंद्र आहे परंतु साधनाअभावि नागरीक जावू शकत नाही.
कायमस्वरूपी आरोग्य कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी नागरीक करीत आहेत.
प्रशासनाने व ग्रामपंचायतने जागृती करावी
नागरीकांनी स्वत:हुन तपासनी करने आवश्यक आहे



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!