राज्यातील घरगुती 300 युनिट वीज वापर करणार्यास तीस टक्के दर कमी करण्यांचे लेखी वचननामा देवून, सत्तेत आलेल्या शिवसेनेने उलट वीज दरात 20 टक्के वाढ करून, मतदारांची फसवणूक केल्यांने, त्यांचे विरोधात भादवीचे 420 व लोकप्रतिनिधीत्व कायदयाप्रमाणे गुन्हा दाखल करावा अशी मागणी आज मूल, सावली, सिंदेवाही, पाथरी, ब्रम्हपुरी पोलिस स्टेशनमध्ये लेखी तक्रारीद्वारे दिली.
मुख्यमंत्री म्हणून धुरा सांभाळल्यानंतर, दिलेले वचन न पाळणे ही त्यांची राजकीय व नैतिक जबाबदारी होती, मात्र ती न पाळता, उलट 1 एप्रिल 2020 पासून तब्बल 20 टक्के वीज बील माफ करून मतदारांची फसवणूक केल्यांचा आरोप या तक्रारीत केला आहे.
यापूर्वीही लॉकडाउनच्या काळातील वीज बिल माफ करावे यासाठी आम आदमी पार्टी राज्यात सतत आंदोलन करीत आहे. याच आंदोलनाचा एक भाग म्हणून राज्यभर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे विरोधात, शिवसेनेच्या वचननाम्यासह गुन्हा दाखल करण्यांच्या मागणीसाठी तक्रारी दाखल केलेल्या आहेत.
मूल पोलिस स्टेशनमध्ये राज्य समितीच्या नेत्या अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी तक्रार दाखल केली, यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विजय सिध्दावार, जिल्हा युवा अध्यक्ष गौरव शामकुळे, अमित राउत, सिंदेवाही येथे तालुका अध्यक्ष शशीकांत बतकमवार यांनी तक्रार दाखल केली, यावेळी शांताराम आदे, सुनिल घाटे उपस्थित होते. सावली येथे राजू सोनुले यांनी तक्रार दाखल केली, यावेळी रंजिता गिरीजाशंकर दुधे, सोनाली भंडारे, रंजिता नायडू सह कार्यकर्ते उपस्थित होते. ब्रम्हपुरी येथे आप युवा चे जिल्हाध्यक्ष गौरव शामकुळे यांनी तक्रार दाखल केली. यावेळी कुमूद भोयर, महेश दुधबळे, प्रणय दागमवार उपस्थित होते.
मूल, सिंदेवाही व राजूरा तहसिलदारांची बदली
मूलचे तहसिलदार डी.जी. जाधव, सिंदेवाहीचे तहसिलदार गणेश जगदाळे आणि राजूुरांचे तहसिलदार होळी यांची आज बदली झाली आहे.
मूलचे तहसिलदार जाधव यांची नरखेड येथे, तर राजुराचे तहसिलदार होळी मूलचे तहसिलदार म्हणून रूजू होणार आहे. नरखेडचे तहसिलदार हे राजूरांचे नवे तहसिलदार म्हणून रूजू होतील.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!