ग्रामस्थांना भेटवस्तु देवून वाढदिवस साजरा

ग्रामस्थांना भेटवस्तु देवून वाढदिवस साजरा


सचिन वाकडे, मुल

               अनेक नागरिक आपली प्रतिष्ठा दाखवण्यासाठी अनावश्यक खर्च करून आपल्या मुलांचा वाढदिवस साजरा करीत असतात. मात्र याला मूल येथे ठाकरे परिवार अपवाद ठरला आहे. व्यवसायाने किराणा व्यावसायिक असलेले राकेश शेषराव ठाकरे यांच्या रशीता नामक मुलीचा सहावा वाढदिवस असल्याने त्यांनी तालुक्यातिल दुर्गम व आदिवासी बहुल डोणी या गावात जाऊन यंदा स्टीमर, साबण, मास्कचे वाटप केले. ज्या मानवी समाजात आपण जन्माला आलो, त्या मानवी समाजाला आपले काही देणे लागते. या उदात्त भावनेतून ठाकरे परिवार दरवर्षी उपजिल्हा रुग्णालय, अनाथालय, वृद्धाश्रम, मुकबधिर शाळेत जावून त्यांना भेटवस्तु देत मुलीचा वाढदिवस साजरा करीत असतात. 
              यंदा कोरोना संकटामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोनामुळे नागरिकांचे व्यवसाय, तथा रोजगारावर कुऱ्हाड कोसळलेली आहे. अडचणीत असलेल्यांना एक हात मदतीचा देणारे अनेक पक्ष, संघटना पुढे सरसावत गरजूंना राशन, कपडे यासारख्या अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. 
               वाढदिवसात होणारा अनावश्यक खर्च टाळून, तो लोकपयोगी सत्कारणी लावण्याचा नवा पायंडा घालत ठाकरे परिवार समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण करीत आहे. रशीताचा वाढदिवसानिमित्त ठाकरे परिवार गरजूंना मदत करीत असले, तरी प्रसिद्धीपासून लांब राहणे ते पसंत करतात. या परिवाराने घातलेला पायंडा अनेकांना ही आदर्श ठरू पाहत आहे.
               यावेळी डोणी येथे स्टीमर वाटप करताना नगर परिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, नगर सेवक प्रशांत लाडवे, किशोर कापगते, शैलेश बुटले, पराग ढोक, विवेक मुत्यालवार, श्याम उराडे, इर्तिश वाडगुरे, सुरेश फुलझेले, अक्षय गजपुरे, सौरभ वाढई तथा ठाकरे कुटुंबीय उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!