आदिवासींना मिळणार कृषी संजीवनी मशाखेत्री यांचे आवाहन : विहीर,अन्य पॅकेजसाठी बिरसा मुंडा योजना



मूल : (प्रमोद मशाखेत्री) 
अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतक—यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी,त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी व स्वयंपूर्ण करण्याचे दुष्टीने शासनाच्या आदिवासी योजनेत सुधारणा केली आहे.
 आदिवासी शेतक—यांसाठी बिरसा मुंडा क्रांती योजना 2020—21 राबविण्यात येत आहे. दीड लाख मर्यादेत वार्षिक उत्पन्न असणा—या अनुसूचित जमातीच्या शेतक—यांना याचा लाभ मिळणार आहे. सदर योजनेत विविध प्रकारचे पॅकेज दिले जाणार आहेत. यामध्ये कुठल्याही एक पॅकेजचा लाभ घेता येणार आहे. शेतक—यांना विहीर,पंपसंच,वीज,जोडणी,आकार,सुक्ष्मसिंचन संच,पाईप बरसबाग या बरोबरच मागेल त्याला शेततळे केलेले असेल,त्या शेतक—यांनाही याचा लाभ घेता येणार आहे. याशिवाय ज्यांना स्वखर्चातून विहीर केली,त्यांना पंपसंच,वीज जोडणी आकार,सुक्ष्म सिंचन संच,परसबाग,आदीचा समावेश केला आहे. या योजनेचा लाभ केवळ आदिवासी शेतक—यांनाच घेता येणार आहे. 
 असे मिळणार अनुदान : नवीन विहीर अडीच लाख,जुनी विहीर दुरूस्ती 50 हजार,ईनवेलबोअरिंग 20 हजार,वीज जोडणी आकार 10 हजार,शेततळयाचे प्लास्टिक अस्तरीकरण 1 लाख,सुक्ष्म सिंचन संच 90 टक्के अनुदान,परसबाग 500 रूपये,तर पाईपसाठी30 हजार रूपये या प्रमाणे अनुदान दिले जाणार आहे.
लागणार कागदपत्र : आधार कार्ड,सातबारा,नमुना आठ,बॅकेचे पासबूक,मोबाईल
15आॅक्टोबर पासून शासनाच्या संेकतस्थळावर आॅनलाईन् अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शेतक—यांनी 14 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन सामाजीक कार्यकर्ता प्रमोद मशाखेत्री यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!