धान पिकावरील तुडतुडा ग्रस्त भागाची कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञांकडून पाहणी व मार्गदर्शन
धान पिकावरील तुडतुडा ग्रस्त भागाची कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञांकडून पाहणी व मार्गदर्शन
ब्रम्हपुरी ( विनोद चौधरी ) : एक ऑक्टोंबर रोजी ब्रम्हपुरी तालुक्यात धान पिकावरील तुडतुडा किडींची पाहणी करून त्यावर प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याविषयी मार्गदर्शन कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही येथील शास्त्रज्ञ व कृषी विभागाचे अधिकारी यांच्याकडून करण्यात आले.
महापुराच्या फटक्यात शेतकरी बांधव बाहेर पडतो न पडतो तोच धानपिकावर तुडतुडा किडीने आक्रमण केलेला आहे यात संपूर्ण धानपिक नष्ट झालेला आहे कृषी विभागाच्या अधिकारी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली त्यानुसार कृषी अधिकारी यांनी कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही वरिष्ठांना माहिती कळविली धान पिकावरील तुडतुडाग्रस्त भागाची पाहणी करण्याकरिता कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ संशोधक डॉक्टर नागदेवते व उपविभागीय कृषी अधिकारी खेडकर, कृषी अधिकारी वाघचौरे, पीडी खंडाळे तालुका कृषी अधिकारी निलेश कुमार मंद्रे ,सुमेध दहिवले यांनी नान्होरी, तोरगाव अर्हेरनवरगाव, नांदगाव जानी मालडोंगरी, चौगान इत्यादी गावांचा दौरा करून धान पिकाची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले दौऱ्याच्यावेळी संबंधित कृषी विभागाचे कृषी सहाय्यक व मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!