मोहर्ली वन व्याप्त परिसरातील मोह फुलाचे सडवे नष्ट

मोहर्ली वन व्याप्त परिसरातील मोह फुलाचे सडवे नष्ट


चंद्रपुर :(मोहम्मद सुलेमान बेग) 

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली वन व्याप्त परिसरात मोह फुलाची दारू काढण्यात येत असल्याचे उघडकीस आले. मागील काही दिवसांपूर्वी वन विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यानी मोह फुलांचे सडवे नष्ट केले होते तरी देखील मोह फुलांची दारू काढने सुरूच आहे. असे निदर्शनास येताच दिनांक 18 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळच्या सुमारास ए. डी. मल्लेलवार क्षेत्र सहाय्यक मोहर्ली यांनी मोह फुलांचा सडवा नष्ट केले व दारू काढण्यास लागणारे साहित्य देखील जप्त केले. 
त्या परिसरात पट्टेदार वाघाचा वावर असल्यामुळे मानव व वन्यजीव संघर्ष रोखण्याचे काम व जंगलातील जलाऊ सरपण अवैध रित्या जमा करण्यास प्रतिबंध करत आहे.
सदर परिसर हा वन व्याप्त असल्याने या परिसरात मोह दारू काढण्यात येऊ नये अन्यथा संबंधितावर कडक कारवाही करण्यात येईल. असा इशारा वन विभागा तर्फे देण्यात येत आहे
यावेळी ए. डी. मल्लेलवार क्षेत्र सहाय्यक मोहर्ली, जनबंधु, येनुरकर, केजकर, व्हायळ वनरक्षक व इतर वन मजूर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!