गावातील परंपरा कायमच व अतुलनीय अशी घटना- आप नेते मनोहर बोडके
राजुरा - प्रतिनिधी ( रोशन येवले )
राजुरा : - जिवती तालुक्यातील नंदप्पा या गावातील प्रवीण पोळे हा युवक भारतीय सैन्य दलात जॉईन झाला आहे. आणि आर्मी ट्रेनिंगला जाणार अशे समजतात गावातील मित्र मंडळी संपुर्ण गाववाशीच निरोप देण्यासाठी एकत्र जमा झाले. आणि या युवकाचा संपुर्ण गावभर मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला. सर्वत्र कौतुक होऊ लागले मित्र मंडळीनी तर नाचू नाचू दमले होते.नाचत नाचत सर्वत्र मित्र मंडळीनी निरोप दिला व भावी आयुष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.देशाच्या सैन्य दलात शामिल होण्यासाठी भाग्य लागत नंदप्पा या गावासाठी हा शन अतुलनीय होता.सर्व गावकऱ्यांनी भावनेने निरोप दिला. यावेळी आप नेते मनोहर बोळके अंकुश तुपलौने नवनाथ कोकनारे नागनाथ फड तिरुपती कुंडजीर मुख्यध्यापक देविदास चिटघरे प्रामुख्याने उपस्थित होते.


प्रविण पोळे चे सैन्यात भरती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा !
उत्तर द्याहटवा