आठ ग्रामस्थांना ठार मारणारा आर टी-1 वाघाला जेरबंद करण्यात वन विभागाला यश
आठ ग्रामस्थांना ठार मारणारा आर टी-1 वाघाला जेरबंद करण्यात वन विभागाला यश
चंद्रपुर:(मोहम्मद सुलेमान बेग)
मागील आठ महीण्या पासून वनविभाग आर टी-1 वाघाचा शोध घेत होते अखेर आज दिनांक 27 ऑक्टोबर 2020 रोजी विरुर येथे एका रेल्वे पुलाच्या खाली त्याला पडण्यासाठी तयार केलेले कृत्रिम लोखंडी पिंजऱ्यात हा वाघ मिळाला याची माहिती वन विभागाला मिळताच घटनास्थळी येऊन त्या वाघाला बेशुद्ध करून पिंजऱ्यात बंद केले.
राजुरा उपविभागामघ्ये आठ ग्रामस्थांना ठार मारणारा आर टी-1 वाघ पिंजऱ्यात अडकला. जंगला लगत शेती असल्यामुळे शेतीच्या कामाला व जंगलात गेलेल्या लोकांवर हा वाघ हल्ले करत होता.
आता शेतातील पिकं काढण्याचे दिवस जवळ आल्याने शेतीच्या कामाला जात असलेल्या व परिसरातील ग्रामस्थांने वाघाला लवकरात लवकर जेरबंद करा किंवा त्याला ठार मारा अशी मागणी वन विभागाकडे केलेली होती.
ऑगस्ट महिन्या पासून आर टी-1 वाघाला पकडण्यास प्रयत्न सुरूच होते. अखेर आज आर टी-1 वाघाला पकडण्यास वन विभागाला यश मिळाले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!