रक्षाबंधन सणावर कोरोनाचे सावट : आॅनलाईन होणार भावा—बहिणींची भेट
रक्षाबंधन सणावर कोरोनाचे सावट : आॅनलाईन होणार भावा—बहिणींची भेट
कोरोनामुळे झाला बहीण भावाच्या नात्याचा दुरावा
मूल (प्रमोद मशाखेत्री):— श्रावणी पौर्णिमा अर्थात बहिण भावाच्या नात्यातील एक अतुट बंधन म्हणजे रक्षाबंधन ! या दिवशी प्रत्येक बहिणीच्या मनात आपल्या प्रिय भावाबदल शुभकामना व शुभ भावना यांचा जणू सागरच उसळत असतो. भारतीय संस्कृतीतील ही काही क्षणांची ऐतिहासिक परंपरा बालपणापासूनच एक भाऊ आणि एक बहिण यांना एका निरागस बंधनांमध्ये घट बांधून ठेवते. आणि त्यांचे हे नाते अतूट आणि परमपवित्र मानले जाते.परंतू यंदा सर्व जग कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडल्याने सोशल डिस्टन्सिंगमूळे कोरोनाच्या रूपाने बहीण भावाच्या अतूट नात्यात दुरावा निर्माण केल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे.
रक्षाबंधन या सणाची भाऊ आणि बहिण आतुरतेने वाट बघत असतात. लग्न्र झालेली दूरवर राहणारी बहिण आपल्या भावाच्या मनगटावर प्रेमाचा हा रेशमी धाग्यामध्ये बहिणीचा आपल्या भावाला एक अबोल निरोप असतो की,दादा आज तुझी ही बहिण या आशेने राखी बांधत आहे की,भविष्यात जेव्हा मला तुझी गरज भासेल तेव्हा याच दणकट हातांनी तु मला मदत करशील. माझे रक्षण करण्यास समर्थ असशील.
हा रेशमी धागा मना मनांना एकत्र घट बांधून ठेवणार आहे. रक्षाबंधन सणावर कोरोनाचे सावट असल्याने यावर्षी बहिणीला व्हाटसअप,आॅनलाईन किंवा व्हिडिओकॉल व्दारेच भावाचे दर्शन घेऊन संवाद साधता येणार आहे.
कोरोनामुळे म्हणावेसे वाटते,अरे देवा ! कोरोनामुळे झाला बहीण भावाच्या नात्यात दुरावा !




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!