गडचिरोली जिल्हाचे पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांना टायगर ग्रुप सिरोंचा तर्फे रक्त पिढी उपलब्ध करून देण्यात यावी याकरीता दिले निवेदन
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )
चंद्रपूर : - टायगर ग्रुप महाराष्ट्राचे संस्थापक पै.जालिंदर जाधव व अध्यक्ष पैं.तानाजी जाधव यांच्या आदेशानुसार टायगर ग्रुप गडचिरोली जिल्ह्याचे प्रमुख दिपक भारसागडे यांच्या मार्गदर्शनाखाली टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य शाखा- सिरोंचा,गडचिरोली जिल्हा सदैव जनतेसाठी तत्पर आहे. सिरोंचा येथे दिनांक २ ऑगस्ट २०२० ला राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा गडचिरोली जिल्हाचे पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे हे आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. दुपारी १ वाजता सिरोंचा मुख्यालय येथे आले असता टाइगर ग्रुप सिरोंचा चे प्रमुख विशाल मादेशी, विष्णू कोमरे, मनोज मादेशी यांनी पालकमंत्री साहेबांना सिरोंचा मुख्यालय येथे रक्त पेढी (ब्लड बैंक ) उपलब्ध करुन देण्यास निवेदन सादर केले.गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे ब्लड बैंक आहे. सिरोंचा मुख्यालय पासून १२० कि. मी. अंतरावर असल्यामुळे आकस्मिक रुग्णासाठी त्वरित सेवा पुरविणे अवघड जाते अशा वेळी नाईलाजास्तव रुग्णाला तेलंगाना येथील दवाखान्यात पाठवावे लागते रुग्णास नाहक त्रास व आर्थिक नुकसान सोसावे लागते त्या करिता सिरोंचा येथील टायगर ग्रुप कडून जिल्ह्याच्या पालकमंत्री साहेब यांना निवदेन देण्यात आले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!