अखेर त्या मोटेगाव-खुटाळा नदी पात्रातील रेती साठ्याच्या चौकशीला चंद्रपूर वरून जिल्हा उत्खनन पथक चिमुरात दाखल



पब्लिक पंचनामाच्या वृत्ताची घेतली प्रशासनाने दखल

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - चिमुर तालुक्यातील खुटाळा - मोठेगाव भु.क. ३९५ मध्ये येत असलेला जप्त केलेला रेती साठा काही दिवसा अगोदर लिलाव करण्यात आला. परंतु तो रेती साठा कायद्याच्या चौकटीत  न उचलता त्या रेतीच्या ढिगाला लागून असलेल्या उमा नदी पात्रातील रेती जे.सी.बी व पोकलँड द्वारे उत्खनन करीत असल्याचे दिसुन येत आहे.रात्रोला पोकलँड व ट्रॅक्टर ने रेती उत्खनन होत असते.
हायवा ट्रक द्वारे नागपुर,गडचिरोली व चंद्रपूर ला रेती भरून वाहतूक केली जाते . नेरी रस्त्याने रात्रभर रेती चे ट्रॅक्टर सुरू असतात. ही  पब्लिक पंचनामा वृत्तात काल दि.११-८-२०२० ला बातमी प्रकाशीत करण्यात अाली होती.प्रशासनाने तात्काल या बातमीची दखल घेऊन या नदी पात्रातील रेती व जप्त केलेल्या त्या साठ्याची चौकशी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!