प्रा.सुरेश हूमने "आचार्य "पदवीने सन्मानीत
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )
चंद्रपूर : - चिमुर तालुक्यातील शेडेगांव ( चिमुर ) येथील आठवले समाज कार्य महाविद्यालय येथील ग्रंथालय विभाग प्रमुख,सहा. प्रा.सुरेश हुमने यानी "युज ऑफ आयसिटी इन सोशल वर्क कॉलेज लायब्ररीज इन महाराष्ट्र: ऐ स्टडी"या विषयावर "शोध प्रबंध तयार करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर यांनी त्यांना आचार्य पदवीने सन्मानीत करण्यात आले. राष्टसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठ, नागपूर येथील ग्रंथालय व माहीतीशास्त्र विभाग प्रमुख , सहयोगी?प्रा.डॉ.सत्यप्रकाश एम निकोसे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपला शोधप्रबंध पूर्ण केला. त्यांनी महाराष्ट्र राज्यातील समाजकार्य महाविद्यालयातील ग्रंथालय व माहीती संप्रेशन तंत्रज्ञानाचा सखोल अभ्यास करुन त्यानी आचार्य पदवी प्राप्त केली. माहीती संप्रेक्षण तत्रज्ञानाचा वापर समाजकार्य महाविद्यालयातील , प्राध्यापक, विद्याथी, संशोधक यांना होणार असुन सामाजीक संशोधन श्रेत्रातही उपयोगी पडणार असल्याचे ते म्हणाले. आपल्या यशाचे श्रेय आठवले समाज कार्य महाविद्यालयाचे संस्थाध्यक्ष प्रा.डॉ. चंदनसिंग रोटोले, केदारसिंग रोटोले ( उपाध्यक्ष), सचिव तथा माजी सिनेट सदस्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर येथील सौ.किरणताई रोटेले, प्राचार्या डॉ. शुभांगी वडस्कर (लुंगे) यांना दिले.राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय, चिमुर येथील माजी प्राचार्य डॉ.वर्गीस अॅन्थोनी, यशवंत महाविद्यालयातील प्रा.डॉ. अंजली महेशगौरी,प्रा.डॉ. चंद्रभान खंगार ,प्रा.डॉ.सुदर्शन खापर्डे ,सौ.ज्योती हुमने यांचेही वेळोवेळी प्रोत्साहन पर मार्गदर्शन लाभले.प्रा.सुरेश हुमने यांना आचार्य पदवी मिळाल्या बदल अधिक्षक सुभाष शेषकर,डॉ.झाडे,बांगडे,डॉ.मिलले, डॉ.कुमरे , गणेश येरमे ,मोहन गुरुले,मनीष जिचकार,अनिल मेश्राम,कू.सिंगणजुडे आणि इतर शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आदीने अभिनंदन केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!