चंद्रपुर जिल्ह्यात जनावरांमध्ये 'लम्पी स्कीन डिसीज' चे लक्षणे मोठ्या प्रमाणात
मोहम्मद सुलेमान बेग
गेल्या काही महिन्यापासून जिल्ह्यात 'लम्पी स्कीन डिसीज' हा जनावरांत फार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. हा विषाणूजन्य चर्म रोग असून यांचे विषाणू कॅप्रीपॉक्स प्रवर्गात मोडतात. हा रोग शेळीना होत नाही. म्हशी मध्ये फार कमी प्रमाणात आहेत.फक्त सर्व वयोगटातील जनावरांना जास्त प्रमाणात आढळून येत आहे.
चंद्रपुर जिल्ह्यात नागभीड, सिंदेवाहीकडे आढळून आले त्यानंतर मुधोली, कोंडेगाव, भांमडेळी, मोहर्ली क्षेत्रात लक्षणे दिसून आले.
या रोगामुळे जनावरांची मरण्याची संख्या फार कमी असते. बाधीत जनावरांचे दूध उत्पादन फार कमी होतो.ते विकृत दिसतात व अशक्त होत जातात.चावणाऱ्या माश्या (स्टोमोक्सीस), गोचीड, डास, चिलटे (कुलीकॉईडीस), गाभण जनावरात प्रादुर्भाव झाल्यास गर्भपात किंवा रोगग्रस्त वासरांचा जन्म होतो तसेच दूध पिणाऱ्या वासरांना आजारी गायीच्या दुधातून रोग होऊ शकतो.
बाधित गायीच्या त्वचेवरील खपल्या गळून पडल्यावर त्यामध्ये 35 दिवस पर्यंत विषाणू जिवंत राहू शकते.
लम्पी स्कीन डिसीज चे लक्षणे म्हणजे जनावरांच्या डोळ्यातून व नाकातून पाणी येणे, सात दिवसात खूप ताप येणे, लसिका ग्रंथींनावर सुज येणे, दुग्ध उत्पादन फार कमी होणे, त्वचेवरील डोके, मान, पाय, मायांग, कास या भागाला गाठी येणे.
हा रोग विषाणूजन्य असला तरी भारतात यावर कोणती ही लस उपलब्ध नाही.
बाधीत जनावरांना वेगळे ठेवावे. निरोगी जनावरां सोबत चरावयास सोडू नयेत. बाधित जनावरांच्या संपर्कातील जनावरांना आयव्हरमेक्टीन चे इंजेक्शन दिल्यास रोग प्रसारात काही प्रमाणात कमी होऊ शकतो.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!