नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या एकदिवसीय काम बंद



नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या एकदिवसीय काम बंद आंदोलन:मुख्याधिकारी यांना दिले निवेदन..!!
नागभिड: पराग भानारकर,
     
        नव्याने स्थापित झालेल्या नगरपरिषदामल कर्मचाऱ्यांना चाऱ्यांना त्यांचा स्थापना दिनांकापासून वेतन व सेवेचा लाभ देण्यात यावा,नगरपरिषद, नगरपंचायत मधील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत, नगरपरिषद व नगरपंचायत मधील उद्घोषणा पूर्वीचे व नंतरचे कर्मचाऱ्यांचे समायोजन करणे बाबत,नगरपरिषद, नगरपंचायत मध्ये सफाई कामगार भरती करणे बाबत,अनुकंपा तत्त्वावरील पदे लवकर भरण्याबाबत,नगरपरिषद कर्मचाऱ्यांना नवीन नियमानुसार विशेष भत्ता लागू करणेबाबत, कर्मचाऱ्यांचे एनपीस खाते काढण्याबाबत, इत्यादी हकाच्या मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत, संवर्ग कर्मचारी संघटना शाखा - नागभीडचे वतीने होत असलेल्या 17 ऑगस्ट 2020 रोजीच्या एक दिवसीय कामबंद आंदोलन संपात नागभीड नगर परिषदेचे सर्व कर्मचारी आपल्या विविध मागण्याकरीता सहभागी होत असल्याने मा. मंगेश खवले मुख्याधिकारी नगर परिषद नागभीड यांना निवेदन दिले आहे..  यावेळी प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण लोंढे, अभियंता अभिषेक शिंदे, अभियंता शशांक डांगे, लेखापाल नकुल भाजीपाले, कर निर्धारक निलीमा रामटेके, न. प. कर्मचारी परसराम वंजारी, मोरेश्वर येरणे, गुलाब ठाकरे, विनायक चौधरी, गजानन समर्थ, निलकंठ कावळे, रितेश येरणे, उमाकांत बोरकर, तुळशिदास कुत्तरमारे, सचिन गरमळे, नितीन दुपारे, संतोष कुंभरे, रवि कुर्झेकर, हरि मरघडे, बाळकृष्ण राऊत, नंदा गोडे, मिनाक्षी खापर्डे, दुर्गा रगडे, आशा शेंदरे इत्यादी कर्मचाऱ्यांनी उपस्थिती होती...!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!