भेजगाव येथे अवैध दारू विक्री विरोधात महिलांचा एल्गार

भेजगाव येथे अवैध दारू विक्री विरोधात महिलांचा एल्गार
ग्रामपंचायत चा पुढाकार
तिघांवर गुन्हा दाखल


भेजगाव (कुमुदिनी भोयर)
चंद्रपूर जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी असली तरी मूल तालुक्यातील भेजगाव येथे अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यात महिला, युवक,आबालवृद्ध व अल्पवयीन मुलेही दारूविक्रीत गुंतले आहेत.
          त्यामुळे गावाची शांतता भंग होत असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. दारु विक्रेत्यांमध्ये रस्सीखेच वाढली असून गावातील मुख्य चौकात ग्रामपंचायतीच्या समोरच दारू विक्रेते दारू विक्री करीत होते.
    त्यामुळे महिला व ग्रामपंचायत यांनी अवैध दारू विक्री विरोधात पुढे सरसावल्या व आज एल्गार पुकारत ग्रामपंचायत सभागृहात बैठक घेतली. बैठकीत प्रत्येक गटाच्या दोन महिला याप्रमाणे जवळपास पन्नास महिलांची दारू दक्षता समिती स्थापन करण्यात आली. व त्यांना दारू पकडणे बाबत सर्व अधिकार देण्यात आले. महिलांनी अवैध दारूविक्रेत्यांची घर झडती करून त्यांना तंबी दिली. संदीप म्याकलवार,याच्याकडे विदेशी व देशी तर संदिप जराते, विकास तेल्लावार नामक दारू विक्रेत्याच्या घरी देशी  दारु सापडली. पोलिसांना पाचारण करून त्यावर कारवाई करण्यात आली. 
     मागील महिन्यात ग्रामपंचायतीने मासिक बैठकीत अवैध दारू विक्री विरोधात दारु बंदीचा ठराव घेऊन ठाणेदार, उपविभागीय पोलिस अधिकारी यांना निवेदन दिले.या निवेदनाने  तीनदा कारवाईसाठी पोलिसांनी धाड टाकली मात्र  दारु सापडत नसल्याने कारवाई झाली नाही. मात्र गावातील दारू विक्री थांबत नव्हती. 
      शेवटी बचत गटांच्या महिलांनी एल्गार पुकारत अवैध दारूविक्री यांच्याविरोधात धाडसत्र सुरू केले. यात एकाचा माल मिळाला तर काही दारू विक्रेत्यांनी कारवाईच्या भीतीपोटी गावातून पळ काढला. महिलांनी आपला अजेंडा असाच सुरू ठेवण्याचा व दारू विरोधातलढण्याचा चंग बांधला असल्याने दारूविक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
        यावेळेस सरपंच अखिल गांगरेड्डीवार, उपसरपंच बबन लेनगुरे, पोलीस पाटील एस डी गणवीर, तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रकाश गांगरेड्डीवार, ग्रामपंचायत सदस्य मुकेश ठाकूर, विवेकानंद उराडे ,चेतना ठाकरे आदींसह 27 महिला बचत गटांच्या शेकडो महिला उपस्थित होत्या.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!