आरोग्य सेविकेचा अतिदक्षता बाल विभागात ऑन ड्युटी चक्कर येऊन उपचारा अभावी तिचा मृत्यू होतोच कसा ? याबद्दल आम आदमी पार्टी चंद्रपुर जिल्हा महानगर तर्फ़े सुनील रत्नाकर भोयर यांचे मार्गदर्शन व नेतृत्वात चंद्रपुर शासकीय रुग्णालय तथा मेडिकल कॉलेज चे डीन साहेबांची भेट घेऊन त्यांच्या द्वारे उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री म.रा., राजेश टोपे, आरोग्यमंत्री म.रा. आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिले निवेदन
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )
चंद्रपूर : - शासकीय महाविद्यालय चंद्रपूर तथा रुग्णालयात ४ ऑगस्ट २०२० ला एक कंत्राटदार आरोग्य सेविकेला अतिदक्षता बाल विभागात ऑन ड्युटी असते आणि चक्कर येते ती जमिनिवर कोसळते तिला त्याच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात येते पण तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार न झाल्याने उपचारा अभावी तिचा मृत्यू होतो.सहा महिन्यापूर्वी तिच्या पतीचे सुद्धा निधन झालेले आहे. या दोघांच्याही मागे तिला एक नाबालीग अपत्य आहे. त्याचे जीवन व्यवस्थित चालावे म्हणून ज्या ठिकाणी एका आरोग्य सेविकेचा योग्य उपचारविना मृत्यू होतो तेथे सामान्य जणांची काय परिस्थिती असावी ? आणि म्हणून या सर्व बाबींचा आढावा घेत आम आदमी पार्टी चंद्रपुर जिल्हा महानगर तर्फ़े सुनील रत्नाकर भोयर यांचे मार्गदर्शन व नेतृत्वात चंद्रपुर शासकीय रुग्णालय तथा मेडिकल कॉलेज चे डीन साहेबांची भेट घेऊन त्यांना त्यांचे द्वारा माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री म.रा., राजेश टोपे आरोग्यमंत्री म.रा, आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना विविध प्रकारच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.१) मृत आरोग्य सेविका स्व. संगीता ताई विश्वनाथ पाटील यांचें वारसाला दिल्ली सरकार प्रमाणे रुपये २५ लाखाची तात्काळ मदत देण्यात यावी.२) या मृत्यूला कारणीभूत अधिकारी,डॉक्टर वर हलगर्जीपणाचा आरोप ठेऊन सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.
३) मेडिकल कॉलेज तथा रुग्णालयातील सर्व प्रकारच्या स्टाफला नियमित करण्यांत यावे.
४)सर्व प्रकारच्या व विभागातल्या स्पेशालिस्ट डॉ स्टाफला ला त्यांची खाजगी प्रॅक्टिस करण्यासाठी निर्बंध लावण्यात यावे.जेणे करून नागरिकांना शासकीय रुग्णालयात तथा मेडिकल कॉलेज ला पूर्ण वेळ देता येईल.उपरोक्त संपूर्ण कार्यक्रमात महानगरचे दुसरे उपाध्यक्ष योगेश आपटे ,अशोक आनंदे सदस्य, अजयभाऊ डुकरे सहसचिव,संदीप पिंपळकर श्रमिक विकास संघटन, दिलीपजी तेलंग, सल्लागार, राजेश चेडगूलवार सोशल मिडिया, शाहरुख शेख,युथ विंग संयोजक, राजेश विराणी,संयोजक, भिवराज सोनी, सुनील मुसळे इत्यादींची यावेळी उपस्थिती होती



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!