जांभुळघाट - हेटी मार्गावर मोटार सायकल व सायकल च्या धडकेत एकाचा मृत्यु तर एक गंभीर जखमी



तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - २० जुलै २०२० ला सायंकाळी ०७:३० वाजता च्या सुमारास जांभुळघाट ते हेटी रोड वर मोटार सायकल व सायकल च्या अपघातकात शेसराव नन्नावरे यांचा मृत्यु झाला.हे शेतीचे काम करून गावाकडे जांभुळघाट मार्गे नेरी ला जात होते. त्याचे चुलत भाऊ अंकुश नंन्नावरे यांच्या घरी नेरी ला राहत होते. वय २८ वर्ष पण मुळ गाव मुक्ताई ता.समुद्रपूर जिल्हा.वर्धा येथले मूळचे रहिवासी होते.


अपघातानंतर चिमुर येथील उप जिल्हा रूग्णालयामध्ये उपचार करण्यात अाले पण डोक्याला जास्त मार असल्याने जिल्हा सामान्य रूग्णालय चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले.चिमूर वरून चंद्रपूर ला नेत असतांनाच मृत्यु झाला.तर दुसरा नरेश राऊत हा गंभीर जखमी झाला असून हेटी ता.चिमुर येथील रहिवासी आहे. हा सायकल ने जांभुळघाट वरून आपल्या हेटी या गावाकडे जात होता. या परिसरात मोठ्या प्रमाणात वळण मार्ग असून अपघातांच्या संख्येत वाढ होतांना दिसत आहे. या अपघातामुळे
नंन्नावरे परीवारावर दु:खा चे डोंगर कोसळले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!