चिमूर तालुक्यात अवैध रित्या रेती मुरूमाचे होणारे उत्खनन थांबवावे - नितीन मत्ते जिल्हा खनिज प्रतिष्ठान सदस्य व शिवसेना जिल्हा प्रमुख



उप विभागीय अधिकारी तथा तहसीलदार यांना दिले निवेदन

जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )

चंद्रपूर : - दिनांक.२०/०७/२०२० चिमूर तालुक्यात मोठ्या प्रमानावर अवैध रित्या रेती मुरूमाचे होणारे उत्खनन थांबविण्यात यावे यासाठी नितीन मत्ते यांच्या नेतृत्वाखाली धरमसिंह वर्मा यांनी उप विभागीय अधिकारी तथा तहसीलदार यांना निवेदन दिले.
व तालुक्यातील अवैध रेतीची व मुरूमाची चोरी थांबवावी जर थांबविण्यात आली नाही तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असाही ईशारा यावेळी देण्यात आला. यावेळी नितीन मत्ते जिल्हा खनिज प्रतिष्ठान सदस्य तथा जिल्हा प्रमुख शिवसेना  , धरमसिंह वर्मा मा. उप जिल्हा प्रमुख , मनोज तिजारे उप तालुका प्रमुख , केवलसिंग जुनी उप तालुका प्रमुख , विजय गोठे उप शहर प्रमुख , श्रीहरी सातपुते विद्यार्थी सेना उप जिल्हा प्रमुख , सुधाकर निवटे जेष्ट शिवसैनिक , विशाल बोकडे उप शहर प्रमुख उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!