शेतात मोटर पंप चालू करतांना शेतकरी जागीच ठार

शेतात मोटर पंप चालू करतांना शेतकरी जागीच ठार 

विजेचा शॉक लागून शेतकरी जागीच ठार 



मूल/प्रतिनिधी :
    गोंडपिंपरी तालुक्यातील शिवनी या गावातील शेतकरी खुशाबराव ताजणे हे शेतात काम करीत असतांना विद्युत करंट लागल्याने जागीच ठार झाले. शेतात पिकाला पाणी करण्यासाठी गेले असता मोटर पंप सुरू करतांना करंट लागल्याने जागीच ठार झाले.
    खुशाबराव ताजणे हे घरातील कर्ता पुरूष असून त्यांच्या कुटूंबावर दु:खाचे डोंगर कोसळले आहे. प्रशासनानी मदत करावी, अशी कुटूंबियांची मागणी आहे. या घटनेनी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!