मूल येथे शिव भोजन केंद्राचा शुभारंभ

मूल येथे शिव भोजन केंद्राचा शुभारंभ


मुल (प्रतिनिधी)
येथील विविध शासकीय कार्यालय परिसरात महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमांतर्गत गरीब, गरजू व बाहेरगावच्या विद्यार्थ्यांच्या अन्नाची भूक भागविण्याकरिता दिनांक 31 मे ला दु. 12 वाजता शिवभोजन केंद्राचा शुभारंभ लाभार्थी ताराबाई निकोडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. रामभाऊ महाडोळे अ. भा. महात्मा फुले समता परिषदेचे पूर्व विभाग जिल्हाध्यक्ष प्रा. विजय लोनबले, जिल्हा महिला कार्याध्यक्षा शशिकला गावतुरे, नामदेव गावतुरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गंगाधर कूनघाडकर, प्राचार्य कऱ्हाडे, तालुका ओबीसी संघटक युवराज चावरे, प्रशांत भरतकर, प्रा. गुलाब मोरे, तौसिफ सय्यद, ‌ गौतम बिश्वास, रशीद शेख, राकेश मोहुर्ले, विक्रांत मोहुर्ले, किशोर चूधरी आदी मान्यवर उपस्थित होते
सदर शिवभोजनकेंद्र दुष्यांत रेस्टारंट चे मालक दुष्यांत मनोहर महाडोळे यांना वाटपा करिता 75 शिवभोजन थाळी मंजूर करण्यात आलेली आहे. या शिवभोजन केंद्राचा मूल शहर व ग्रामीण भागातील गरजूंना लाभ मिळत आहे. त्यामुळे नागरिकांनी महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केलेले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!