जनाब जावेद रफिक खान पठाण यांची राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक चिमूर तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )
चंद्रपूर : - दि.०१/०६/२०२० राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्रपूर जिल्ह्याचे अल्प संख्यांक अध्यक्ष मोहम्मद मेहमूद मो. मुसा यांनी जनाब जावेद रफिक खान पठाण यांच्या समाज कार्याला बघून व संपूर्ण पडताळणी करून राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक चिमूर तालुका अध्यक्ष पदी त्यांची नियुक्ती केली.जनाब जावेद रफिक खान पठाण हे गोरगरीब जनतेच्या हाकेला नेहमीच धावून जात असतात ते राजकारण , समाजकारण जनतेच्या परी मान सन्मान जपणारे असा त्यांचा स्वभाव व मनमिळाऊ पणा त्यांचा मोठ्या प्रमाणात चिमूर तालुक्यात चाहता वर्ग आहे.त्यांनी कधीही कुठल्याही राजकीय पदाची हाव न ठेवता सेवा देण्याचे कार्य बघून जनाब जावेद रफिक खान पठाण यांची राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक चिमूर तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
आज संपूर्ण चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले.कलम १४४ तसेच सोशल डिस्टन्स व लॉक डाऊन चे पालन करीत व्हॉट्सअप द्वारे साक्षांकित नियुक्ती पत्र देण्यात आले.हे आज च्या परिस्थिती सुंदर उपक्रमाची बाब ठरली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चिमूर विधानसभा अध्यक्ष सुरेश रामगुंडे,चिमूर तालुका अध्यक्ष योगेश ठुने , चिमूर शहर अध्यक्ष मंगेश बारापात्रे , व अन्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!