पेशाने शिक्षक असलेल्याला अवैद्य दारु तस्करी करतांना रंगेहात पकडले

पेशाने शिक्षक असलेल्याला अवैद्य दारु तस्करी करतांना रंगेहात पकडले

देसाईगंज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल: शिक्षकी पेशाला काळीमा फासले


देसाईगंज दि १ (प्रतिनिधी)
देसाईगंज तालुक्यातील आमगांव येथील लोकसेवा माध्यमिक विद्यालयात शिक्षक असलेला तसेच नागपुर येथुन प्रकाशित होणाय्रा दैनिक पुण्यनगरी वृत्तपत्राचा तालुका पत्रकार असलेल्या रविंद्र बाबुराव कुथे वय ४० याला गस्तीवर असलेल्या देसाईगंज पोलिसांनी अवैद्य दारु तस्करी करतांना मुद्देमालासह ३२,५०० रुपयाची अवैद्य दारु रंगेहात पकडुन गुन्हा दाखल केल्याने पत्रकारिता क्षेत्रात व शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे.
पोलीस निरिक्षक प्रदीप लांडे यांनी सांगीतले कि, आरोपी रविंद्र बाबुराव कुथे हा आज सकाळीच गडचिरोली-भंडारा जिल्हा सिमेवर सावंगी चेकपोस्ट वर जाऊन लाखांदुर ला जायचे आहे असे सांगीतले परंतु चेकपोस्ट वर तैनात पोलिसांनी इ-पास नसल्याने जाण्यास मज्जाव केला. त्यांनतर आज दैनिक लोकमत मध्ये इटियाडोह धरणाच्या मार्गावरुन कंटेनमेंट झोन मधुन अनेक नागरिक विना परवानगी शहरात दाखल होत असल्याची बातमी प्रकाशित करताच या मार्गावर पोलीस गस्त वाढविण्यात आली होती.
दरम्यान अगदी सकाळीच सावंगी चेकपोस्ट पोलिसांशी हुज्जत घातलेला इसम आरोपी रविंद्र बाबुराव कुथे इटियाडोह धरणाच्या रस्त्याने येतांना गस्तीवर असलेल्या देसाईगंज पोलिसांना आढळला. पोलिसांनी हात देऊन थांबविले असता त्यांच्या हालचालीवर संशय आल्याने मोटार सायकल ची व अंग झडती घेतली असता रॉयल स्टॅग कंपनीची मोठी निप,हंटरस्ट्रॉंग कंपनीचे ४ टिनाचे सेल, देशी दारु च्या ४ निपा यासह होंडा कंपनीची जुनी टु व्हीलर गाडीसह एकुण ३२ हजार ५०० रुपयाची मुद्देमालासह अवैद्य दारु तस्करी करतांना पकडले.
                   आरोपी रविंद्र बाबुराव कुथे याला देसाईगंज पोलीस स्टेशन मध्ये पकडुन आणुन त्याच्यावर अपराध क्रमांक १४२/२०२० भादंवी कलम ६५(अ), ९८(क), ८३ मुंबई दारु कायद्यांतर्गत  गुन्हा दाखल करण्यात आला असुन संचारबंदीचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्ह्यात वाढ होण्याची शक्यता असुन उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भंवर व पोलीस निरिक्षक प्रदीप लांडे यांच्या मार्गदर्शनात महिला पोलीस कॉंस्टेबल कोमल व नायक पोलीस हवालदार जनबंधु यांनी केली.

शिक्षकी पेशाला काळीमा फासले

आरोपी रविंद्र बाबुराव कुथे हा देसाईगंज तालुक्यात सन २००६ पासुन स्थापित आमगांव येथील लोकसेवा माध्यमिक विद्यालयात शिक्षक या पदावर कार्यरत आहे. सदर शैक्षणिक संस्थेला शासनाने सप्टेंबर २०१६ पासुन २०℅ अनुदान देणे सुरु केलेला असल्याने या वेतनात कुटुबांचा उदरनिर्वाह आरामात होऊ शकते मात्र आजच्या घटनेमुळे शिक्षकी पेशाला काळीमा फासले असुन शिक्षकाना खाली मान टाकण्याची नामुस्की ओढवली आहे.
पत्रकारितेच्या आड अवैद्य दारु तस्करी
सावंगी चेकपोस्ट वर पोलिसांशी हुज्जत घालुन विना परवानगी भंडारा जिल्ह्यातील लाखांदुर येथुन अवैद्य दारु तस्करी करणारा आरोपी  रविंद्र बाबुराव कुथे हा नेहमीच लाखांदुर ला जात असतो मात्र पेशाने शिक्षक व एका प्रसिद्ध वृत्तपत्राचा पत्रकार असल्याने पोलीस देखिल अंग झडती करायला धजावत नाही परंतु हा आरोपी नेहमीच लाखांदुर येथुन अवैद्य दारु तस्करी करतो या घटनेमुळे शिक्कामोर्तब झाले असुन पोलिसांच्या नेहमी टॉर्गेट मध्ये राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!