अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकी चालक ठार
अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकी चालक ठार
नेरी - जांभुळघाट रोडवरील घटना
शंकरपूर (जगदीश पेंदाम)
नेरी ,जांभुळघाट रोड वरील रामपुर बसस्टॉपच्या समोरील पुलाजवळ आज सकाळी ९.३० वाजता च्या दरम्यान नेरी वरून दुचाकीने .( दुचाकी क्रमांक एम.एच.- ३४ एस - ७०१४ ,) जात असताना अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत नेरी येथील अनील हरीचंद्र कामडी वय -३८ वर्ष यांचा जागीच म्रुत्यु झाला .
या अपघताच्या घटनेची माहीती नेरी चौकीच्या पोलीसांना मिळताच घटना स्थळी पोहचुन पंचनामा केला . म्रुत पावलेल्या इसमाला शववीच्छेदनासाठी उपजील्हा रूग्णालय चीमुर येथे पाठवीण्यात आले असुन त्या अज्ञात चारचाकी वाहनावर भांदवी कलम ३०४ (अ ) , २७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास ए.पी.आय.खैरकर करीत आहेत...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!