८ लाखाच्या मुद्देमालासह अवैदय दारू विक्रेत्यास अटक


मूल (अमित राऊत)

मूल पोलिस स्टेशनच्या डिबी पथकाने मध्यरात्री मारोडा येथील रामु उत्तरवार यांचे घराजवळ सापळा रचून 8 लाख रूपयाच्या मुददेमालासह दारू पकडली. यामुळे मारोडात खळबळ माजली असून, आरोपी रामू सह इतर दोन आरोपींना अटक केली आहे.

मागील अनेक महिण्यापासून, रामू उत्तरवार हा अवैदय दारूच्या व्यवसायात होता. काल रात्रौ डिबी पथकाला, रामु उत्तरवार यांचेकडे अवैदय दारू विक्रीसाठी येणार असल्यांची माहीती मिळाली. या माहीतीचे आधारे पोलिस पंचासमक्ष रामूच्या घरावर पहारा देवून बसले असतांना, रात्रौ 2 वाजताचे दरम्यान काळी सुमो (MH 40 A 3866) मध्ये 20 पेटी देशी दारू आढळून आली. पोलिसांनी, 1. निखिल हरीदास देवगीरीकर (वय 30) राह. जाटलापूर, तह. सिंदेवाही, 2. अनिकेत रवी गौरकार (वय 19) राह. जाटलापूर, तह. सिंदेवाही व 3. रामकुमार ऊर्फ रामा राजेश उत्तरवार (वय 38) राह. मारोडा तह. मूल जि. चंद्रपूर यांना ताब्यात घेतले. दारू सह, टाटा सुमो वाहन, मोबाईल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी आरोपीला आज कोर्टासमोर हजर केले असून, यातील आरोपी रामा उत्तरवार हा पूर्वी काही काळ पोलिसांसोबत पोलिस मित्र म्हणून वावरत होता, हे उल्लेखनीय!
उपविभागीय पोलिस अधिकारी अनुज तारे आणि पोलिस निरीक्षक सतिशसिंह राजपुत यांचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक पुरूषोत्तम राठोड पोह पढाल, पुंडलिक परचाके, शफीक शेख श्रावण कुत्तरमारे यांनी ही कामगीरी बजावली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!